Join us

India Vs England : ... तरंच भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकते

इंग्लंडच्या माजी खेळाडूने जाहीर केले गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:26 IST

Open in App
ठळक मुद्देभारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

लंडन : भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका गमवावी लागली. आता कसोटी मालिका तरी भारतीय संघ जिंकणार का, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. पण भारत ही मालिका जिंकू शकतो, असं मत इंग्लंडच्याच एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केलं आहे. पण हे मत व्यक्त करताना त्या क्रिकेटपटूने एक अटही घातली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या संघाने सरावाला सुरुवात केली असली तरी भारतीय संघ मात्र सध्या आपल्या कुटुंबियांबरोबर इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहे.

इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने भारत इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकू शकतो, असं वक्तव्य केलं आहे. याबाबत स्वान म्हणाला की, " भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकू शकतो, पण जर चेंडू स्विंग होऊ शकला नाही तरंच. जर चेंडू स्विगं व्हायला लागला तर इंग्लंड ही मालिका सहजपणे जिंकेल. " 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ