लंडन: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंइंग्लंडविरुद्ध केलेल्या खेळीवर सध्या सोशल मीडियावर टीका होत आहे. फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीसला कालच्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारता आले नाहीत. धोनीसह केदार जाधवनंदेखील एकेरी धावांवर भर दिला. या सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या पाच षटकांमध्ये 71 धावांची आवश्यकता होती. मात्र धोनी आणि केदारनं मोठे फटके खेळण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे भारताला 39 धावाच करता आल्या. धोनी आणि केदारच्या या पवित्र्यावर सोशल मीडियावरुन अनेकांनी टीका केली आहे. याशिवाय क्रिकेट तज्ज्ञांनीदेखील नाराजी व्यक्त केली. मात्र भारतीय क्रिकेट संघानं धोनी आणि केदारचा बचाव केला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs England: धोनी अन् केदारनं संथ फलंदाजी का केली? रोहित, विराटनं सांगितलं कारण
India Vs England: धोनी अन् केदारनं संथ फलंदाजी का केली? रोहित, विराटनं सांगितलं कारण
धोनी-केदारच्या फलंदाजीवर चाहते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 11:42 IST