Join us  

ICC Women's T20 World Cup, Semi-Final: भारत-इंग्लंड सामन्यात चौकारांचा नियम असता तर काय झाले असते?

ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना सुरू होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 10:34 AM

Open in App

ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना सुरू होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे सामना रद्दच करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित समजला जात आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात न आल्यानं हा निर्णय घेण्यात येणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो. पण, समजा हा नियम चौकारांच्या जोरावर लावला असता तर काय झाले असते?

गतवर्षी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत चौकाराच्या नियमामुळे इंग्लंडला जेतेपद पटकावता आले होते. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना निर्धारीत 50-50 षटकांत आणि सुपर ओव्हरमध्ये बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सर्वाधिक चौकार मारणाऱ्या संघाला म्हणजेच इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यावरून बराच वाद झाला. अखेरीस आयसीसीनं तो नियम बदलून निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळण्यात येईल असा नवा नियम आणला.

पण, आजच्या महिला क्रिकेट सामन्याच्या उपांत्य फेरीत तोही नियम लागू होण्याची शक्यता कमीच आहे. कारण पावसामुळे सामना अजूनही सुरु झालेला नाही. आयसीसीच्या स्पर्धा नियमानुसार किमान २० षटकांचा सामना झाला पाहिजे. त्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १० षटके मिळावीत. पण, तसेही होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित आहे. मात्र, जर चौकारांचा नियम असता तर इंग्लंडची अंतिम फेरी पक्की झाली असती. इंग्लंडने या स्पर्धेत एकूण ७२ चौकार मारले आहेत, तर भारताच्या खात्यात ५९ चौकार आहेत. पण, सुदैवानं हा नियम नाही आणि भारतानं अ गटात 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का आहे.  

 एकही चेंडू पडला नाही तरी टीम इंडिया जाईल फायनलमध्ये, जाणून घ्या कशी

मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२० वर्ल्ड रेकॉर्ड!

MS Dhoni बद्दलच्या 'त्या' एका प्रश्नानं घडवलं सुनील जोशींचं भवितव्य!

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकइंग्लंडभारत