Join us  

IndvsEng: वीरूकडून हार्दिक पांड्याचं बारसं; नवं नाव वाचून तुम्ही पोट धरून हसाल!

विरेंद्र सेहवागकडून हार्दिक पांड्याचं बारस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 12:39 PM

Open in App

मुंबई: इंग्लंडविरुद्धचा तिसरा टी-20 सामना जिंकून भारतानं मालिका 2-1 नं खिशात घातली. भारतानं सात गडी आणि आठ चेंडू राखून इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचं अनेकांनी अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे या विजयासह कोहलीच्या संघानं सलग सहा टी-20 मालिका जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विट्ससाठी ओळखला जातो. काल भारतीय संघानं इंग्लंडला धूळ चारताच वीरूनं त्याच्या स्टाईलमध्ये संघाचं अभिनंदन केलं. भारतीय फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीचं वीरूनं तोंडभरून कौतुक केलं. त्यानं ट्विटमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याचा विशेष उल्लेख केला आहे. सेहवागनं पांड्याला कुंफू पांडा म्हटलं आहे. हार्दिकनं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली, अशी स्तुतीसुमनं सेहवागनं उधळली आहेत. 

हार्दिक पांड्यानं 38 धावांमध्ये इंग्लंडच्या 4 फलंदाजांना बाद केलं. पांड्यानं त्याच्या शानदार गोलंदाजीनं इंग्लंडच्या मधल्या फळीला धक्के दिले. त्यानं धोकादायक अॅलेक्स हेल्स, कर्णधार इयन मॉर्गन, बेन स्टोक्स आणि जॉनी बेरस्टॉला तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या मधल्या फळीतील एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारणार नाही, याची काळजी पांड्यानं घेतली. यानंतर त्यानं फलंदाजातही चमकदार कामगिरी केली. विराट कोहली बाद झाल्यावर मैदानावर उतरलेल्या पांड्यानं अवघ्या 14 चेंडूंमध्ये 33 धावा चोपून काढल्या. यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. 

टॅग्स :विरेंद्र सेहवागहार्दिक पांड्याभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटटी-20 क्रिकेटइंग्लंड विरुद्ध भारत