Join us

Rohit Sharma Covid-19 Positive: इंग्लंड टेस्टआधी टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह

१ ते ५ जुलै दरम्यान रंगणार कसोटी सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 08:45 IST

Open in App

Rohit Sharma Covid-19 Positive: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोनाचा फटका बसला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मारोहित शर्मा कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी (२५ जून) झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये रोहित शर्मा पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विट करून याला दुजोरा दिला आहे. BCCIने लिहिले की, 'शनिवारी झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) मध्ये कर्णधार रोहित शर्माची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. BCCI चे वैद्यकीय पथक त्याची काळजी घेत आहे.'

लेस्टरशायरविरुद्ध सुरू असलेल्या भारतीय संघाच्या सराव सामन्यात रोहित शर्मा सहभागी होता, पण खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात रोहित फलंदाजीसाठी आला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित पहिल्या डावात सलामीला आला होता, तेव्हा रोमन वॉकरने त्याला बाद केले. रोहितने २५ धावा केल्या होत्या.

रोहितने शानदार कामगिरी

गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरला. नंतर, कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर अंतिम टेस्ट रद्द करण्यात आली. रोहितने चार कसोटी सामन्यांमध्ये ५२ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या, ज्यात ओव्हलवरील शतकाचा समावेश आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. भारताने एजबॅस्टन कसोटी किमान ड्रॉ केली, तर ते मालिकाही जिंकतील. पाचवा कसोटी सामना १ ते ५ जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माकोरोना वायरस बातम्याभारतीय क्रिकेट संघ
Open in App