IND vs ENG संजूचा पहिल्या बॉलवर सिक्सर! स्टँडमध्ये आमिर खाननं वाजवल्या टाळ्या, पण...

संजू सॅमसन याने तोऱ्यात सुरुवात केली, पण दुसऱ्याच षटकात त्याने विकेटही फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 19:40 IST2025-02-02T19:38:47+5:302025-02-02T19:40:07+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 5th T20I Sanju Samson Hitting First Ball Of A T20I For A Six Aamir Khan clap But Batter 5th consecutive dismissalsame way in this T20I series | IND vs ENG संजूचा पहिल्या बॉलवर सिक्सर! स्टँडमध्ये आमिर खाननं वाजवल्या टाळ्या, पण...

IND vs ENG संजूचा पहिल्या बॉलवर सिक्सर! स्टँडमध्ये आमिर खाननं वाजवल्या टाळ्या, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन याने कडक सिक्सरसह डावाची सुरुवात केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत संजूनं खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा भारताचा तो तिसरा बॅटर ठरला. याआधी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी अशी कामगिरी केली होती. वानखेडेवरील भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी सुपरस्टार आमिर खानही स्टेडियमवर उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर सिक्सर मारणाऱ्या संजूला त्याने टाळ्या वाजवून दाद दिली. पण संजूचा हा तोरा फार काळ टिकला नाही. 

..अन् संजू आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुन्हा फसला

संजू सॅमसन इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या सामन्यातही आखूड टप्प्याच्या चेंडूवर झेलबाद झाल्याचे पाहायला मिळाले. याआधीच्या चारही मॅचमध्ये तो याच प्रकारे आउट झाला होता. वानखेडे स्टेडियमवर पहिल्या षटकात आक्रमक फलंदाजी करत मागील उणीव भरून काढण्याचे संकेत त्याने दिले. पण मार्क वूडच्या गोलंदाजीवर तो फसला. ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारासह त्याच्या खेळीला अवघ्या १६ धावांवर ब्रेक लागला. गोलंदाज बदलला मैदान बदलले पण आउट होण्याचा संजूचा पॅटर्न अगदी तोच राहिल्याचा सीन पाहायला मिळाला. 

पाच सामन्यातील ३ सामन्यात दुहेरी आकडाही नाही गाठला 

संजू सॅमसन याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात २० चेंडूत २६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. प्रत्येक सामन्यात  त्याने अनुक्रमे ५, ३ आणि १ धावांवर बाद झाला. यावेळी पहिल्या सामन्याप्रमाणे त्याने दुहेरी आकडा गाठला. पण ही खेळी मोठी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला.  संजूनं पाच सामन्यांच्या मालिकेतील ५ डावात १०.२० च्या सरासरीसह ११८.६० च्या सरासरीनं फक्त ५१ धावा केल्या आहेत.

 

Web Title: India vs England, 5th T20I Sanju Samson Hitting First Ball Of A T20I For A Six Aamir Khan clap But Batter 5th consecutive dismissalsame way in this T20I series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.