भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटरल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवनं घरच्या मैदानावर पहिल्यांदा बॅटिंग करणं हा प्लानचा भाग होता, असं सांगत पाहुण्या इंग्लंडसमोर तगडे चॅलेंज उभे करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. या सामन्यात अर्शदीप सिंगच्या जागी पुन्हा एकदा मोहम्मद शमीला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लयीत येण्यासाठी तो या सामन्यात कशी कामगिरी करतोय ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इंग्लंडच्या संघानंही मार्क वूडच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (विकेटकीपर/बॅटर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
फिलिप साल्ट (विकेटकीपर/बॅटर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
भारतीय संघानं पुण्याच्या मैदानातील चौथा टी-२० सामना जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. वानखेडेच्या मैदानातील पाचव्या सामन्यातील विजयासह भारतीय संघ मालिका ४-१ अशी आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून आगामी वनडेसाठी आत्मविश्वासाने मैदानात उतरण्यासाठी प्रयत्नशील असेल.