९ चौकार, ५ षटकार ! यशस्वी जैस्वालचे वन डे स्टाईल शतक, रोहित शर्माचे सेलिब्रेशन पाहा Video

कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर जैस्वालने दमदार खेळ करताना शुबमन गिलसह मोठी भागीदारी केली. जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 04:09 PM2024-02-17T16:09:40+5:302024-02-17T16:10:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test Live Updates Day 3 - HUNDRED BY YASHASVI JAISWAL, he smashed his 3rd Test hundred in career | ९ चौकार, ५ षटकार ! यशस्वी जैस्वालचे वन डे स्टाईल शतक, रोहित शर्माचे सेलिब्रेशन पाहा Video

९ चौकार, ५ षटकार ! यशस्वी जैस्वालचे वन डे स्टाईल शतक, रोहित शर्माचे सेलिब्रेशन पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd Test Live Updates Day 3 -  पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरेल्या भारतीय संघासाठी यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) आणखी एक शतक झळकावले. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर जैस्वालने दमदार खेळ करताना शुबमन गिलसह मोठी भागीदारी केली. जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. 


आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली, त्यामुळे भारतीय संघाला एका गोलंदाजाची उणीव जाणवेल असे वाटले होते. पण मोहम्मद सिराजने ४, कुलदीप यादवने २ व रवींद्र जडेजाने २ विकेट्स घेत इंग्लंडला गुंडाळले. भारताच्या पहिल्या डावातील ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर गडगडला. बेन डकेटने १५१ चंडूंत २३ चौकार व २ षटकारांसह १५३ धावा केल्या. कुलदीप यादवने त्याची विकेट मिळवून दिली. त्यानंतर बेन स्टोक्स ( ४१) ला रवींद्रने माघारी पाठवून इंग्लंडला संकटात टाकले. पाहता पाहता इंग्लंडचा कालच्या २ बाद २०७ धावांवरून आज ३१९ धावांवर गडगडला. इंग्लंडने ९५ धावांत ८ विकेट्स गमावल्या.  



जो रुटने दुसऱ्या डावात रोहितला ( १९) पायचीत केले. पण, शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून उभी राहिली. यशस्वीने आणखी एक अर्धशतक झळकावताना जेम्स अँडरसनच्या एका षटकात ६,४,४ असे फटके खेचले. यशस्वी व गिल यांनी १२२ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. जैस्वालने पहिल्या ५० चेंडूंत फक्त १८ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ५० चेंडूंत त्याने ७२ धावा कुटल्या. या मालिकेत ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.  यशस्वीने १२२ चेंडूंत शतक पूर्ण केले. मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक ठरले. 

Web Title: India vs England 3rd Test Live Updates Day 3 - HUNDRED BY YASHASVI JAISWAL, he smashed his 3rd Test hundred in career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.