Join us

फक्त कॅच घेऊन संजू गप्प नाही बसला; आत्मविश्वास दाखवला अन् Not Out बटलर Out ठरला!

मैदानातील पंचांनी बटलरला ठरवलं नॉट आउट, संजूनं आत्मविश्वास दाखवला अन् टीम इंडियाचा रिव्ह्यू यशस्वी ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:17 IST

Open in App

राजकोटच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहुण्या इंग्लंडला भारतीय संघानं दुसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. पण त्यानंतर जोस बटलर आणि बेन डकेट जोडी जमली. एका बाजूला सलामीवीर बेन डकेटनं अर्धशतक पूर्ण केले दुसऱ्या बाजूला बटलर पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतीये, असे वाटत असताना पुन्हा एकदा वरुण चक्रवर्ती टीम इंडियाचा मदतीला धावला. त्याने टी-२० मालिकेत कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडच्या कॅप्टनची विकेट घेतली. ही विकेट वरुण चक्रवर्तीच्या खात्यात जमा झाली असली तरी याचं मोठं श्रेय हे विकेट किपर संजू सॅमसनला जाते. त्याने अप्रतिम कॅच पकडलाच. याशिवाय त्यानं चेंडू बॅटची कड घेऊन हातात विसावलाय हा आत्मविश्वास दाखवला अन् त्यामुळेच भारतीय संघाल ही विकेट मिळाली.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बटलर अति आत्मविश्वास नडला, संजूचा आत्मविश्वास भारतासाठी भारी ठरला  

टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघानं सॉल्टच्या रुपात अवघ्या ७ धावांवर पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर बेन डकेट अन् जोस बटलर या जोडीनं संघाचा डाव सावरला. दोघांनी ७६ धावांची भागीदारी करत टीम इंडियाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. पण नवव्या षटकात जोस बटलरनं रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला अन् तो फसला. बॅटची किंचित कड घेऊन आलेला चेंडू संजू सॅमसन याने पकडला. 

भारतीय संघाचा रिव्ह्यू ठरला यशस्वी

वरुण चक्रवर्तीसह भारतीय ताफ्यातून अपील झाली. पण मैदानातील पंचांनी बटलरच्या बाजूनं निर्णय दिला. पण विकेटमागे उभा असलेला संजू अधिक आत्मविश्वासानं कॅप्टनकडे गेला.  बॅट कट असल्याची गोष्ट त्याने कॅप्टन सूर्यकुमारला पटवून दिली. अन् सूर्यानंही संजूवर भरवसा दाखवत रिव्ह्यू घेतला. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत याआधी भारतीय संघाने जे रिव्ह्यू घेतले ते अपयशी ठरले होते. पण यावेळी संजूचा आत्मविश्वासामुळे टीम इंडियाला रिव्हूवचा डाव  यशस्वी ठरला. रिप्लायमध्ये चेंडू बॅटची कड घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले अन् तिसऱ्या पंचांनी बटलरला आउट दिले. तो २२ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २४ धावा करून माघारी फिरला.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडसंजू सॅमसनजोस बटलर