IND vs ENG : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर कसा आहे टीम इंडियाचा वनडेतील रेकॉर्ड?

इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या वनडे आधी एक नजर अहमदाबादच्या मैदानातील भारतीय संघाच्या रेकॉर्डवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:55 IST2025-02-11T10:52:18+5:302025-02-11T10:55:25+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd ODI Team India ODI Record At Narendra Modi Stadium Ahmedabad | IND vs ENG : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर कसा आहे टीम इंडियाचा वनडेतील रेकॉर्ड?

IND vs ENG : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर कसा आहे टीम इंडियाचा वनडेतील रेकॉर्ड?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG, 3rd ODI, Team India ODI Record in Ahmedabad : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पहिला आणि दुसरा वनडे सामना अगदी सहज जिंकत टीम इंडियानं ही मालिका खिशात घातली आहे. आता तिसरा आणि अखेरचा वनडे सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. १२ फेब्रुवारीला रंगणारा हा सामना जिंकून भारतीय संघ मोठ्या रुबाबात अन् आत्मविश्वासाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईला रवाना होण्यासाठी प्रयत्नशील असेल. इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या वनडे आधी एक नजर अहमदाबादच्या मैदानातील भारतीय संघाच्या रेकॉर्डवर

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कसा आहे टीम इंडियाचा अहमदाबादच्या मैदानातील रेकॉर्ड?

या मैदानात भारतीय संघाने १९८४ मध्ये पहिला वनडे सामना खेळला होता. २०२३ मध्ये टीम इंडिया इथं अखेरचा वनडे सामना खेळलीये. या दरम्यान भारतीय संघानं अहमदाबादच्या मैदानात एकूण २० एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ११ सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला असून ९ सामन्यात टीम इंडियाच्या पदरी निराशा आली आहे. वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने याच मैदानात भारतीय संघाला पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती. हाच टीम इंडियाने या मैदानात खेळलेला शेवटचा वनडे सामना आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघ पाहुण्यांना क्लीन स्वीप करणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत उतरण्याआधी वनडे वर्ल्ड कपमधील पराभवाची कसर भरून काढत इंग्लंड विरुद्धची तीन सामन्यांची मालिका ३-० अशी खिशात घालण्याची संधी भारतीय संघाला आहे. 

प्रयोगाची शेवटची संधी

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी संघात बदल करण्याचा आणि परफेक्ट कॉम्बिनेशनचा अंदाज घेण्याच्या दृष्टीनेही भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण ठरेल. पहिल्या दोन सामन्यात अक्षर पटेलला बढती देण्यात आली असून केएल राहुलवर संघाने फारसा भरवसा दाखवलेला नाही. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडिया त्याच्यासह मैदानात उतरणार की,  विकेट किपर बॅटरच्या रुपात पंतला  आजमावणार ते देखील पाहण्याजोगे असेल.

Web Title: India vs England 3rd ODI Team India ODI Record At Narendra Modi Stadium Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.