Join us  

India vs England, 2nd Test : बेन स्टोक्सची अखिलाडूवृत्ती; बाद झाला म्हणूनं केलं निंदनीय कृत्य, Video

India vs England, 2nd Test shameful act by Ben stokes : भारतानं दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात पाच विकेट्स गमावूनही भारतानं ३५१ धावांच्या वर आघाडी नेली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 15, 2021 12:27 PM

Open in App

India vs England, 2nd Test : भारतानं दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात पाच विकेट्स गमावूनही भारतानं ३५१ धावांच्या वर आघाडी नेली. आर अश्विन व विराट कोहली यांनी ७व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना भारताचा दुसरा डाव सावरला. या सामन्यात खेळपट्टीवरून सोशल मीडियावर दिग्गज खेळाडूंमध्ये कलगीतूरा रंगलेला पाहायला मिळताना. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याची खिलाडूवृत्ती हरवल्याचे चित्र पाहायला मिळालं. इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सचा ( १८) त्रिफळा उडवून आर अश्विननं टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं होतं. अश्विननं बाद केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या स्टोक्सनं मैदानाबाहेर होताच हेल्मेटला लाथ मारली आणि त्याचा हा राग कॅमेरामननं कैद केला. रोहित शर्मानं सामना सुरू असताना रिषभ पंतला मारली टपली, Viral Video पोस्ट करून वीरू म्हणतो...

पाहा व्हिडीओ...

दरम्यान, ग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाला सकाळच्या सत्रात एकामागून एक धक्के दिले. फिरकीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली. मोईन अली व जॅक लिच यांनी पहिल्या सत्रात टीम इंडियाला पाच धक्के दिले. पण, आर अश्विन ( R Ashwin) व विराट कोहली ( Virat Kohli) यांनी पडझड थांबवली आणि भारताची आघाडी ३५१ धावांपर्यंत नेली. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं ६ बाद १५६ धावा केल्या आहेत. अश्विन व विराट यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे.  ५ तास, ५३ मिनिटांत संपली कसोटी मॅच, ११ विकेट्स घेत गोलंदाजानं रचला इतिहास!

आर अश्विननं या सामन्यात विराटसह ७व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा तो सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे.Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्सआर अश्विन