India vs England, 2nd Test : Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video 

सकाळच्या सत्रात घडले भलतेच. पुजारा पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. ( Strange dismissal for Cheteshwar Pujara). त्यानंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला यष्टिचीत करून माघारी पाठवले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 15, 2021 10:05 AM2021-02-15T10:05:28+5:302021-02-15T10:06:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd Test : Strange dismissal for Cheteshwar Pujara; Excellent work from Pope and Foakes, Video  | India vs England, 2nd Test : Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video 

India vs England, 2nd Test : Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसकाळच्या सत्रात भारताला तीन मोठे धक्के, अजिंक्य रहाणेला जीवदानजॅक लिचनं टीम इंडियाच्या दोन फलंदाजांना पाठवलं माघारी

India vs England, 2nd Test Day 3 : भारताला तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पहिल्या काही षटकांतच दोन मोठे धक्के बसले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी तिसऱ्या दिवसाच्या डावाची सुरुवात केली. भारतानं पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी घेत विजयाचा मजबूत पाया रचला होता. त्यावर ही जोडी धावांचा डोंगर उभा करेल, असा अंदाज होता. पण, सकाळच्या सत्रात घडले भलतेच. पुजारा पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. ( Strange dismissal for Cheteshwar Pujara). त्यानंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला यष्टिचीत करून माघारी पाठवले. IPL 2021 लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू कामगिरी; २६ चेंडूंत चोपल्या ७७ धावा अन्...

मोईन अलीच्या ( Moeen Ali) गोलंदाजीवर पुजारानं पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सिली पॉईंटला उभ्या असलेल्या ऑली पोपनं चेंडू अडवत लगेत यष्टिरक्षकाकडे फेकला आणि फोक्सनं पुजाराला धावबाद केलं. पुजारा क्रिजवर परतला, परंतु त्याच्या हातून बॅट निसटली होती आणि त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. त्यानंतर जॅक लिचच्या गोलंदाजीवर फोक्सनं रोहितला माघारी पाठवलं. फिरकी गोलंदाजांना झोडपण्यासाठी रिषभ पंतला बढती मिळाली, परंतु लिचनं त्यालाही बाद केलं. युवराज सिंगविरोधात FIR दाखल; ८ महिन्यांपूर्वीचं प्रकरण महागात पडणार?







पहिल्या कसोटीतही विचित्र पद्धतीनं झाला होता बाद


चेन्नईच्या खेळपट्टीवरून पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची साथ मिळाली. त्यातही रोहित शर्मा ( Rohit Sharma), अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी दमदार खेळ करताना भारताला पहिल्या डावात ३२९ धावा करून दिल्या. पण, इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फारकाळ जम बसवता आला नाही आणि आर अश्विनच्या ( R Ashwin) जाळ्यात ते सहज अडकले. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९४ धावांची आघाडी घेतली.  दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ५४ धावा करताना २४९ धावांनी आघाडी वाढवली होती. 

Web Title: IND vs ENG 2nd Test : Strange dismissal for Cheteshwar Pujara; Excellent work from Pope and Foakes, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.