५ तास, ५३ मिनिटांत संपली कसोटी मॅच, ११ विकेट्स घेत गोलंदाजानं रचला इतिहास!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटची अधिक क्रेझ आहे. पण, पूर्वी पाच दिवसांच्या कसोटी मालिकेला अधिक महत्त्व होतं. पण, याच कसोटी मालिकेत एका सामन्याचा निकाल केवळ ५ तास व ५३ मिनिटांत संपला होता. ( Test match lasted only five hours, 53 minutes)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटची अधिक क्रेझ आहे. पण, पूर्वी पाच दिवसांच्या कसोटी मालिकेला अधिक महत्त्व होतं. पण, याच कसोटी मालिकेत एका सामन्याचा निकाल केवळ ५ तास व ५३ मिनिटांत संपला होता.

ऑस्ट्रेलिया आमि दक्षिण आफ्रिका (Australia vs South AFrica) यांच्यात हा सामना खेळवण्यात आला होता आणि या सामन्यात एका गोलंदाजानं २४ धावा देताना ११ विकेट्स घेतल्या होत्या. सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून हा रेकॉर्ड आजही या गोलंदाजाच्या नावावर आहे.

बर्ट आयर्नमोंगर ( Bert Ironmonger) असे या गोलंदाजाचे नाव आहे. १२ ते १५ फेब्रुवारी १९३२ साली हा सामना रंगणार होता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जॅक कॅमेरून यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला. पण, त्याचा हा निर्णय एका भयाण स्वप्नात रुपांतरीत होईल, असा विचारही कॅमेरूननं केला नसावा.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ३६ धावांवर गडगडला. संघातील दहा खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्णधार कॅमेरूननं सर्वाधिक ११ धावा केल्या. तीन फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. बर्ट आयर्नमोंगरनं ६ धावा देताना पाच विकेट्स घेतल्या. लॉरी नॅशनं चार विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात १५३ धावा केल्या. अॅलन किप्पास्कनं ४२ आणि जॅक फिंगलटननं ४० धावा केल्या. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात कमबॅक करतील असे वाटले होते, परंतु काहीच बदललं नाही. दुसऱ्या डावात त्यांना केवळ ४५ धावा करता आल्या.

यावेळी पाच फलंदाज भोपळ्यावरच माघारी परतले. कुर्नोनं सर्वाधिक १६ धावा केल्या. बर्ट आयर्नमोंगरनं १५.३ षटकांत ७ निर्धाव षटकं फेकून १८ धावांत ६ विकेट्स घेतल्या.

बर्ट आयर्नमोंगरनं या सामन्यात २४ धावांत ११ विकेट्स घेत इतिहास रचला. सांगण्यासाठी हा सामना चार दिवस चालला, परंतु त्यातील एक दिवस विश्रांतीचा होता आणि तीन दिवस पावसानं व्यत्यय आणले. त्यामुळे एकूण ५ तास ५३ मिनिटंच हा सामना रंगला.