India vs England, 2nd Test Day 3 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून कमबॅक केले, परंतु कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विन यांनी दमदार फटकेबाजी सुरू ठेवली आहे. दरम्यान, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा ( Rohit Sharma) यानं रिषभ पंत ( Rishabh Pant) याला टपली मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यान हा व्हिडीओ पोस्ट करून फिरकी घेतली. ५ तास, ५३ मिनिटांत संपली कसोटी मॅच, ११ विकेट्स घेत गोलंदाजानं रचला इतिहास!
भारताच्या पहिल्या डावातील ३२९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव १३४ धावांवर गडगडला आणि टीम इंडियानं १९५ धावांची आघाडी घेतली. आर अश्विननं पाच विकेट्स घेतल्या, तर पदार्पणवीर अक्षर पटेल व इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याच दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूची विकेट घेण्याचा जल्लोष करताना रोहितनं रिषभला कानाखाली मारली. Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video
रिषभनं या सामन्यात फलंदाजीत आणि यष्टिंमागे कमाल दाखवली. रिषभनं पहिल्या डावात ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ५८ धावा केल्या. पंतनं कसोटी क्रिकेटमध्ये सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. चेन्नई कसोटीत त्यानं पहिल्या डावात ९१ धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ९७ व नाबाद ८९ धावा चोपल्या होत्या. चेन्नई कसोटीत रिषभनं यष्टिंमागे दोन अप्रतिम झेल टिपले.
IPL 2021 लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू कामगिरी; २६ चेंडूंत चोपल्या ७७ धावा अन्...