Join us  

India vs England, 2nd Test : मॅचसाठी जीव धोक्यात घालतायेत लोकं, चेन्नई स्टेडियमवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

India vs England, 2nd Test : १३ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा सामना स्डेटियमवर जाऊन पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत आणि या उत्साहात त्यांच्याकडून कोरोना नियम मोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 12:36 PM

Open in App
ठळक मुद्देशनिवारपासून सुरू होणार दुसरा कसोटी सामना, टीम इंडिया मालिकेत ०-१ अशा पिछाडीवरचेन्नईतील या कसोटीत ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची बीसीसीआयची परवानगी

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 2nd Test ) यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश देण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला होता. त्यानुसार या सामन्याच्या तिकिटांचा दरही तामिळनाडू क्रिकेट असोसिएशननं नुकतेच जाहीर केले होते. पण, प्रेक्षकांना सामना पाहताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. १३ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा सामना स्डेटियमवर जाऊन पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत आणि या उत्साहात त्यांच्याकडून कोरोना नियम मोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. चेन्नईच्या एम ए चिंदबरम स्टेडियमबाहेर  (M. A. Chidambaram Stadium) तिकिट खरेदीसाठी झुंबड उड्याल्याचे चित्र आहे. BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

सर्व तिकिटांची ऑनलाईन विक्री झाली आहे, परंतु ते घेण्यासाठी त्यांना स्टेडियमच्या इथे यायला भाग पडत आहे. जवळपास एका वर्षानंतर भारतीय चाहत्यांना स्टेडियमवर लाईव्ह क्रिकेट सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.  तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''ऑनलाईन बुक केलेलं तिकीट ११ फेब्रुवारीपासून तिकिट खिडकीवर मिळेल, अशी घोषणा तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात आली होती. पण, लोकांपर्यंत चुकीचा मॅसेज गेला आणि स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी झाली. परिस्थिती लवकरच हाताळण्यात आली.''   कुलदीप यादवला संधी नाहीच, 'या' खेळाडूचे पदार्पण; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI!

जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI!इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया बरोबरी मिळवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरणार आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं निवडलेल्या अंतिम ११ खेळाडूंच्या निर्णयाचे समर्थन केलं. फिरकीपटू कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) न खेळवल्यामुळे टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर टीका झाली होती. पण, आता टीम इंडिया दुसऱ्या कसोटीच्या तयारीला लागली आहे.

टीम इंडियाचा संभाव्य संघ ( Team India's likely playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडकोरोना वायरस बातम्याबीसीसीआय