Join us

India vs England 2nd Test Live : लॉर्ड्सवर पावसाची बॅटिंग अन् डायनिंग टेबलवर खेळाडूंसाठी शाही मेजवानी, जाणून घ्या मेन्यू! 

India vs England 2021 2nd test match live cricket score : भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यातही पावसानं व्यत्यय आणला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:11 IST

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score : भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यातही पावसानं व्यत्यय आणला आहे. बुधवारी हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार लॉर्ड्सवरील कसोटीत पाऊस पडण्याची तुरळक शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली अन् खेळ उशीरा सुरू करावा लागला. त्यानंतर पावसामुळेच ६ मिनिटे आधी लंच घ्यावा लागला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकताना टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले अन् रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिल. लंच ब्रेकपर्यंत भारतानं एकही विकेट न गमावता ४६ धावा केल्या आहेत. त्यात रोहित शर्माच्या ३५ आणि लोकेशच्या १० धावांचा समावेश आहे. ( An early lunch has been taken!) 

धक्कादायक; भारतीय वंशाच्या महिलेला करावा लागला वर्णद्वेषाचा सामना, इंग्लंडच्या चाहत्यांकडून लज्जास्पद वागणूक!

शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे कर्णधार विराट कोहलीनं आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता होती आणि इशांत शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.  इंग्लंडने आज संघात तीन बदल केले. प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यानं दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. त्याव्यतिरिक्त आजच्या सामन्यात झॅक क्रॅवली व डॅन लॉरेन्स यांना विश्रांती दिली असून त्यांच्याजागी हसीब हमीद, मोईन अली आणि मार्क वूड यांची निवड केली आहे. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

 लंच ब्रेकमध्ये क्रिकेटपटूंसाठी कोणकोणत्या पक्वानांची मेजवानी आहे ते माहित्येय?

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडपाऊस
Open in App