Join us  

Ind vs Eng : "चेन्नईची खेळपट्टी फालतू, कसोटीच्या लायकीची नाही"; मांजरेकर संतापले

India vs England, 2nd Test Chennai: भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी यांनी चेन्नईच्या खेळपट्टीवरुन नाराजी व्यक्त केलीय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 5:57 PM

Open in App

India vs England, 2nd Chennai Test : भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटीतील चेन्नईच्या खेळपट्टीवरुन जोरदार आक्षेप नोंदवला जात आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन, इयान बेल आणि भारताचे माजी फलंदाज संजय मांजेरकर (Sanjay Manjrekar) यांनी चेन्नईच्या खेळपट्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. वॉन यांनी तर चेन्नईच्या खेळपट्टीला सागरी किनारा म्हणत खिल्ली उडवली आहे. तर संजय मांजेरकर यांनी खेळपट्टी अतशिय फालतू आणि कसोटी क्रिकेटच्या लायकीची नसल्याचं म्हटलं आहे. (India vs England Chennai Pitch)

ज्याला संघातून बाहेर काढलं, त्यानंच कोहलीला शून्यावर माघारी धाडलं!

भारत आणि इंग्लंड दरम्यानचे पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत खेळविण्यात येत आहेत. पहिल्या कसोटीत खेळपट्टीवर पहिल्या दोन दिवसांत गोलंदाजांना अजिबात मदत मिळाली नाही. त्यानंतर शेवटच्या तीन दिवसांमध्ये खेळपट्टीचा नूरच पालटला होता. त्यामुळे गोलंदाजांना खूप चांगली मदत मिळाली होती. तर दुसरीकडे आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत याच खेळपट्टीवर पहिल्याच दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळताना पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी चेंडू चांगलेच वळताना पाहायला मिळाले. 

मुंबईकरांची चेन्नईत 'खडूस' खेळी, पहिल्या दिवसावर टीम इंडियाची पकडसंजय मांजरेकर यांनी खेळपट्टीच्याअजब कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "मी काही कडक शब्दांत व्यक्त झालो मग मला सोशल मीडियात ट्रोल केलं जातं. पण ही खेळपट्टी कसोटी खेळायच्या लायकीचीच नाही. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची फलंदाजी आणि गोलंदाजीची अपेक्षा असतो तेव्हा त्या दर्जाची खेळपट्टी देखील तयार करायला हवी. पहिल्याच दिवसाचा अवघ्या अर्ध्या तासाचा खेळ झाल्यानंतर खेळपट्टीला चिरा पडत असतील तर हे चुकीचं आहे. या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणता येणार नाही. अतिशय फालतू खेळपट्टी तयार करण्यात आली आहे", असं संजय मांजरेकर म्हणाले. 

इंग्लंडचे माजी कर्णधार वॉन यांचीही टीकाइंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल म्हणाला की ज्यापद्धतीचा खेळपट्टीचा नूर पहिल्या दिवशी पाहायला मिळतोय ते पाहता खेळ पाचव्या दिवसापर्यंत जाईल असं वाटत नाही. तर दुसरीकडे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी तर चेन्नईच्या खेळपट्टीला थेट समुद्र किनाऱ्यांचीच उपमा दिली आहे. "चेन्नईचा 'पीच' नसून 'बीच' आहे. जर नाणेफेक गमावूनही इंग्लंडने विजय प्राप्त केला तर हा इंग्लंडसाठी शानदार विजय ठरेल", असं वॉन म्हणाले.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडचेन्नईबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ