India vs England, 2nd T20I : भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने चेन्नईतील चेपॉकच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉसनंतर प्लेइंग इलेव्हनमधील बदलासह त्याने स्टार ऑलराउंडर नितीशकुमार रेड्डी मालिकेतून आउट झाल्याची माहिती दिली. एवढेच नाही तर रिंकू सिंह एक ते दोन मॅचेसला मुकणार असल्याचेही त्याने सांगितले. या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :
संजू सॅमसन (विकेट किपर बॅटर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन
बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर/बॅटर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.