इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे विराट कोहलीला बाकावर बसण्याची वेळ आली. विराट कोहली हा फिटनेस आयकॉन आहे. आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत फारच कमी वेळा दुखापतीमुळे त्याच्यावर बाहेर बसण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील त्याच्यावर आलेली वेळ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी टीम इंडियाच्या ताफ्यातील टेन्शन वाढवणारी अशीच आहे. तो या दुखापतीतून रिकव्हर होऊन पुढच्या सामन्यात मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. इथं एक नजर टाकुया विराट कोहलीवर याआधी किती वेळा आलीये दुखापतीमुळे बाकावर बसण्याची वेळ त्यासंदर्भातील स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खांद्याची दुखापत
२०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील शेवटच्या कसोटी सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे विराट कोहलीवर प्लेइंग इलेव्हन बाहेर राहण्याची वेळ आली होती. रांची कसोटी सामन्यात फिल्डिंगवेळी विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर धर्मशालाच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात अजिंक्य राहणेनं त्याच्याऐवजी संघाचे नेतृत्व केले होते.
पाठीच्या दुखापतीमुळे टी-२० सामन्यातून माघार घेण्याची वेळ
२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला होता. यावेळी त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मानं भारतीय संघाचं नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यालाही मुकलाय
२०२२ मध्ये कोहली जोहान्सबर्ग येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकला होता. यावेळीही तो संघाचा कॅप्टन होता. पण तो दुखापतीमुळे सामना मुकल्यावर लोकेश राहुलनं संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाला ७ विकेट्स राखून पराभूत केले होते.
पुढच्या सामन्यात तो दमदार कमबॅक करेल अशी आस
भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आघाडीच्या पाच फंलदाजांपैकी एक आहे. या मालिकेत त्याला जलद १४ हजार धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. यासाठी त्याला जवळपास ९४ धावांची आवश्यकता आहे. पण दुखापतीमुळे आता हा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा डाव लांबणीवर पडला आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईला रवाना होणार आहे. त्याआधी तो या मालिकेतच फिट होऊन हिट कामगिरी करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: India vs England 1st ODI Virat Kohli has missed an Nagpur ODI match due to injury Know Four matches India’s star batter missed out due to injuries
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.