IND vs ENG: अखेरच्या वनडेत कोहलीची सेंच्युरी; इथं पाहा नागपूरच्या मैदानातील टीम इंडियाचा रेकॉर्ड

एक नजर टाकुयात खेळपट्टीसह नागपूरच्या मैदानातील टीम इंडियाच्या कामगिरीवर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 22:23 IST2025-02-04T22:21:53+5:302025-02-04T22:23:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st ODI Vidarbha Cricket Association Stadium Nagpur Pitch Report Stats And Record Virat Kohli Century | IND vs ENG: अखेरच्या वनडेत कोहलीची सेंच्युरी; इथं पाहा नागपूरच्या मैदानातील टीम इंडियाचा रेकॉर्ड

IND vs ENG: अखेरच्या वनडेत कोहलीची सेंच्युरी; इथं पाहा नागपूरच्या मैदानातील टीम इंडियाचा रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st ODI, Nagpur Pitch Report Stats And Record : टी-२० मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत-इंग्लंड द्विपक्षीय मालिकेतील पहिला वनडे सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारीला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. एक नजर टाकुयात खेळपट्टीसह नागपूरच्या मैदानातील टीम इंडियाच्या कामगिरीवर  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कशी असेल विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूरच्या मैदानातील खेळपट्टी?

विदर्भ क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी सामान्यत: फिरकीसाठी अनुकूल मानली जाते. पण व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी ती अधिक उत्तम होते. त्यामुळे या मैदानात षटकार चौकारांच्या बरसातीसह मोठी धावसंख्या होऊ शकते. जो संघ मिडल ओव्हर्समध्ये दमदार खेळ दाखवेल, तो सामन्यावर मजबूत पकड मिळवू शकेल. त्यामुळे या मैदानात नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा बॅटिंग करण्यापेक्षा धावांचा पाठलाग करण्याला पसंती देताना पाहायला मिळाले आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यातही हा ट्रेंड फॉलो केला जाईल, अशी अपेक्षा आहे.   

इथं टीम इंडियाचा जलवा, नागपूरच्या मैदानात फक्त एकाच संघानं दिलाय दणका

२००९ मध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात पहिला सामना खेळवण्यात आला होता. या मैदानात भारतीय संघानं ६ सामने खेळले असून यात फक्त एका सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला या मैदानात पराभूत केले. होते. दुसरीकडे इंग्लंडच्या संघानं या मैदानात २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध एक सामना खेळला होता. ज्यात त्यांनी विजयही नोंदवला होता. 


 २०१९ मध्ये खेळवण्यात आला शेवटचा सामना; विराटच्या भात्यातून आली होती सेंच्युरी

नागपूरच्या मैदानातील अखेरचा सामना २०१९ मध्ये खेळवण्यात आला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत विराट कोहलीनं दमदार शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले होते. विराट कोहलीसाठी हे मैदानात एकदम खास राहिले आहे. इथं पाच डावात त्याने ८१.२५ च्या सरासरीसह १०५ चच्या स्ट्राइक रेटनं ३२५ धावा काढल्या आहेत.
 

Web Title: India vs England 1st ODI Vidarbha Cricket Association Stadium Nagpur Pitch Report Stats And Record Virat Kohli Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.