भारतीय संघात उप कर्णधाराच्या रुपात बढती मिळालेल्या शुबमन गिलनं खांद्यावर पडलेल्या जबाबदारीचं भान ठेवून एकदम दिल खुश करणारी खेळी करून दाखवली. जोपर्यंत श्रेयस अय्यर फटकेबाजी करत होता तोपर्यंत शुबमन गिल अगदी संयमीरित्या खेळताना दिसले. त्याचा हा अंदाज खांद्यावर पडलेली जबाबदारी निभावण्यासाठी तो सक्षम आणि परिपक्व असल्याची झलक दाखवून देणारा होता.
शतकाची संधी होती, त्याच प्रयत्नात फेकली विकेट, पण...
शुबमन गिलला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शतकाची थोडी संधीही निर्माण झाली होती. पण तो ८७ धावांवर बाद झाला. भारतीय संघाने सलामीवीरांच्या विकेट्स अगदी स्वस्तात गमावल्यावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. त्याने या परिस्थितीत उत्तम भूमिकाही निभावली. उंत्तुंग फटका मारण्याचा मोह टाळून त्याने ग्राउंड शॉट्स खेळण्यावर जोर दिला. त्याच्या ८७ धावांच्या खेळीत त्याने १४ षटकार मारले, पण एकही षटकार त्याच्या भात्यातून पाहायला मिळाला नाही. विराट कोहलीच्या जागेवर म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याचे शतक हुकले. पण त्याची ही खेळी भारतीय संघाचा विजय सहज सुलभ करणारी ठरली. पाचव्या वेळी वनडेत तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना दिसला शुबमन
शुबमन गिल हा वनडेत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करतो. पण इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर गेला अन् त्याच्या जागी यशस्वी जैस्वाल याला वनडे पदार्पणाची संधी मिळाली. या परिस्थितीत शुबमन गिलवर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची जबाबदारी मिळाली. पाचव्या वेळी तो वनडेत तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. या क्रमाकांवर खेळताना त्याने याआधी एक शतकी खेळी केली होती. यावेळी फिफ्टीचा रकानाही त्याने पूर्ण केला. तिसऱ्या क्रमांकावर ५ डावात त्याने ५३.२ च्या सरासरीनं २६६ धावा केल्या आहेत.
कोहली आल्यावर पुन्हा ओपनिंगची जबाबदारी, डावाला सुरुवात करताना कसा आहे त्याचा रेकॉर्ड?
वनडे क्रिकेटमध्ये शुबमन गिल याने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना ४३ डावात ५९.६ च्या सरासरीनं त्याने १३ अर्धशतके आणि ५ शतकाच्या मदतीने २१४९ धावा केल्या आहेत. कटकच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली संघात परतेल, असे खुद्द शुबमन गिलनं मॅचनंतर सांगितले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो पुन्हा आपली ओपनिंगची जबाबदारी सांभाळताना दिसेल.