Join us

IND vs ENG: भारतीय संघाविरुद्ध लढण्याआधी बटलरनं व्यक्त केली मनातली भीती; म्हणाला...

इथं जाणून घेऊयात त्याच्या मनात धास्ती निर्माण करणाऱ्या त्या गोष्टीबद्दलची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 19:51 IST

Open in App

Jos Buttler On ODI Cricket Future : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्याआधी पाहुण्या संघाचा कर्णधार जोस बटलर याने मनातील भीती व्यक्त केली आहे. भारतीय संघाला भिडण्याआधी जोस बटलरनं एक मोठं वक्तव्य केल आहे. इथं जाणून घेऊयात त्याच्या मनात धास्ती निर्माण करणाऱ्या त्या गोष्टीबद्दलची माहिती

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बटलरनं या गोष्टीबद्दल व्यक्त केलीये चिंता, म्हणाला...

आता जोस बटलरच्या मनात असणारी भीती म्हणजे तो टीम इंडियातील कुण्या गोलंदाजाला किंवा फलंदाजाला घाबरलाय का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे प्रकरण तसं नाही. त्याने ज्या गोष्टीची चिंता व्यक्त केलीये ती आहे एकदिवसीय क्रिकेटच भविष्य. एकदिवसीय क्रिकेटच भविष्य काय असेल याची चिंताच वाटते, असे तो म्हणाला आहे.  बटलरच्या मते, वनडे हा क्रिकेटमधील खूप महत्त्वपूर्ण फॉर्मेट आहे. आजही क्रिकेटर्सच्या दृष्टीने टी-२० वर्ल्ड कपपेक्षा वनडे वर्ल्ड कप जिंकणं अधिक महत्वाचे वाटते, असेही तो म्हणाला आहे.

सारा जमाना टी-२० चा दिवाना; त्यात वनडेचा भाव घसरला!

सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये जगभरात टी-२० क्रिकेटचं प्रमाण वाढत आहे. परिणामी वनडे सामन्यांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. वनडेतील मोठी स्पर्धा सोडली तर या फॉर्मेटची फारशी क्रेझ दिसत नाही. त्यामुळेच वनडेआधी जोस बटलरनं या फॉर्मेटमधील भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.

नेमकं काय म्हणाला बटलर?

भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी  जोस बटलरनं पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, आगामी काळात एकदिवसीय क्रिकेटचं भविष्य काय असेल त्याचा अंदाज बांधणं माझ्यासाठी कठीण आहे. या फॉर्मेटमध्ये खेळायला मला अधिक आवडते. पण मागील काही दिवसांत आपण यापासून थोडं दूरच जातोय. टी २० आणि फ्रँचायझी क्रिकेटमुळे वनडेच महत्त्व कमी झाल्याचे दिसते. पण जर तुम्ही खेळाडूंना विचाराल तर ते टी-२० वर्ल्ड कप पेक्षा वनडे वर्ल्ड कपला अधिक महत्त्व देतील. 

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजोस बटलररोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ