Join us  

India vs Bangladesh: दुसरा सामना कोलकात्यात, पण तरीही टीम इंडिया अजूनही इंदूरमध्येच

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:29 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. टीम इंडियानं इंदूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं पहिली कसोटी अडीच दिवसातच खिशात घातली. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तरीही भारतीय संघ इंदूरमध्येच आहे. 

कोलकाता येथे टीम इंडिया पहिल्यांदाच डे नाइट कसोटी ( दिवस रात्र) सामना खेळणार आहे. गुलाबी चेंडूचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघांनं इंदूरमध्ये कसून सराव केला. इंदूर कसोटीचा निकाल लवकर लागल्यामुळे दोन्ही संघांकडे डे नाइट कसोटीसाठी सराव करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. विराट कोहली आणि संघानं सोमवारी इंदूर येथे गुलाबी चेंडूवर कसून सराव केला. इंदूर येथे रात्रीचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले की,''आम्ही येथे गुलाबी चेंडूवर खेळण्याचा कसून सराव करत आहे. कोलकाता येथेही आम्ही विशेष सराव सत्राचे आयोजन केले आहे. पहिल्या कसोटीसाठी येथे दाखल झाल्यापासून आम्ही रात्रीच्या सत्रात गुलाबी चेंडूवर खेळण्याचा सराव करत आहोत.'' 

 'विराट' तोफखाना; कोहलीच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजांचं वर्चस्वनवी दिल्ली : भारतीय गोलंदाजांनी गेल्या १० कसोटी सामन्यात १८६ बळी घेतले असून त्यात १२३ बळी वेगवान गोलंदाजांच्या खात्यात गेले आहेत. यावरुन गेल्या काही वर्षात भारताच्या आक्रमणामध्ये सीम व स्विंगची ताकद वाढली असल्याची प्रचिती येते. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांनी केवळ मायदेशातच नव्हे तर विदेशातही आपली छाप सोडली आहे.

कर्णधार विराट कोहलीनेही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. भारतीय संघ गेल्या वर्षभरात १० पैकी ८ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला असून त्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी या सामन्यांत १०२ बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या नेतृत्वाखालील फिरकीपटूंनी या सामन्यांत ५४ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)

कर्णधार कसोटी सामने बळीमहेंद्रसिंग धोनी ६० सामने फिरकीपटू ४७०, वेगवान गोलंदाज ४६६ बळीसौरव गांगुली ४९ सामने फिरकीपटू ४०४, वेगवान गोलंदाज ३६१ बळीमोहम्मद अझहरुद्दीन ४७ सामने फिरकीपटू ३७९, वेगवान गोलंदाज ३१९ बळीसुनील गावस्कर ४७ सामने फिरकीपटू ३१०, वेगवान गोलंदाज ३०४ बळीमंसूर अली खा पतोडी ४० सामने फिरकीपटू ४६८, वेगवान गोलंदाज १०९ बळीकपिल देव ३४ सामने फिरकीपटू २२८, वेगवान गोलंदाज २११ बळीसचिन तेंडुलकर २५ सामने फिरकीपटू १५७, वेगवान गोलंदाज १८२ बळीराहुल द्रविड २५ सामने फिरकीपटू १८६, वेगवान गोलंदाज २११ बळी

कुणी किती बळी घेतलेमोहम्मद शमी १० सामने ४५ बळीजसप्रीत बुमराह ६ सामने ३४ बळीइशांत शर्मा ८ सामने २७ बळीउमेश यादव ४ सामने १७ बळीरविचंद्रन अश्विन ५ सामने २६ बळीरवींद्र जडेजा ८ सामने २६ बळी

१९३२ पासूनची आकडेवारी५३९ सामने ७७६० बळी३२६० बळी(११२ वेगवान गोलंदाज)४४०१ बळी (९७ फिरकीपटू)९९ बळी फिरकी व मध्यमगती अशा दोन्ही प्रकारे गोलंदाजी करणाऱ्यांनी घेतले. (उदा. दत्तू फडकर यांनी कारकिर्दीत ६२ बळी घेतले आहेत.)

कोहलीच्या नेतृत्वाखालील गोलंदाज५२ कसोटी सामने ९११ एकूण बळी४३४ बळी (वेगवान गोलंदाज)४७७ बळी (फिरकीपटू)मायदेशात २५ कसोटीत फिरकीपटूंनी ३०७ व वेगवान गोलंदाजांनी १५१ बळी घेतले. इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाजांनी १४ बळी घेतले. मायदेशात खेळताना एक सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांची ही सातवी सर्वोत्तम कामगिरी आहे. विक्रम १७ बळींचा असून हा २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकातामध्ये नोंदवला गेला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघ