Join us

India vs Bangladesh Test series : रिषभ पंतला डच्चू मिळणार, जाणून घ्या पहिल्या कसोटीत कोण कोण खेळणार!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 13:19 IST

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया कसोटीतील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज आहे. पण, बांगलादेश संघानंही कंबर कसली आहे. पहिल्या ट्वेंटी-20 प्रमाणे टीम इंडियाविरुद्ध कसोटीत पहिल्यांदा विजय मिळवण्यासाठी ते उत्सुक आहे. कर्णधार विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाची फलंदाजांची फळी अधिक मजबूत झाली आहे. पण, रिषभ पंतला संधी देण्यावरून अजूनही मतमतांतर आहे. रिषभ पंतला पाठीवरील अपयशाचं भूत अजूनही उतरवता आलेलं नाही. त्यामुळे या कसोटीत टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन म्हणजेच अंतिम अकरा खेळाडू कसे असतील हे जाणून घेऊया...

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत ही कसोटी मालिका होणार आहे आणि त्यामुळे भारताला अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करण्याची संधी आहे. शकिब उल हसनच्या बंदीमुळे बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे, परंतु याही परिस्थितीत त्यांना कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते. त्यांचा संघ कसा असेल याचीही माहिती करून घेणार आहोत. 

 कसोटी मालिकेसाठीचे दोन्ही संघभारत - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत

बांगलादेश - मोमिनूल हक ( कर्णधार) शदमन इस्लाम, इम्रुल कायस, सैफ हसन, लिटन दास, मुश्फिकर रहीम, महमुद उल्लाह, मोहम्मद मिथून, मुसाडेक होसैन सैकट, मेहिदी सहन मिराझ, तैजूल इस्लाम, नयीम हसन, मुस्ताफीजूर रहमान, अल-अमीन होसैन, अबू जायेद चौधरी, इबादत होसैन. 

संभाव्य प्लेइंग इलेव्हनभारत - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी

बांगलादेश -  मोमिनूल हक ( कर्णधार) शदमन इस्लाम, इम्रुल कायस, सैफ हसन, लिटन दास, मुश्फिकर रहीम, महमद उल्लाह, मोहम्मद मिथून, मेहिदी हसन मिराझ, मुस्ताफिजूर रहमना, अल-अमीन होसैन.  

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीरोहित शर्मामयांक अग्रवालचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेवृद्धिमान साहामोहम्मद शामीरवींद्र जडेजाआर अश्विन