आफ्रिकेनंतर टीम इंडिया करणार बांगलादेशच्या वाघांची शिकार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध बांगलादेश; घरच्या मैदानावर टीम इंडियाची विजयी मालिका कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 12:54 IST2019-10-26T12:54:06+5:302019-10-26T12:54:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
 India vs Bangladesh; Know full schedule, time, date and venue in one click | आफ्रिकेनंतर टीम इंडिया करणार बांगलादेशच्या वाघांची शिकार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

आफ्रिकेनंतर टीम इंडिया करणार बांगलादेशच्या वाघांची शिकार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध बांगलादेश; घरच्या मैदानावर टीम इंडियाची विजयी मालिका कायम आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही टीम इंडियानं निर्भेळ यश मिळवले. ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचेच वर्चस्व राहिले आहे. आफ्रिकेनंतर आता टीम इंडिया बांगलादेश संघाशी भिडणार आहे. वेतनवाढी व अन्य सुविधांच्या मागणीसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सुरु केलेला संप अखेर शाकिब अल हसन याच्या नेतृत्त्वाखाली मागे घेतला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मागण्या मान्य केल्यानंतर खेळाडूंनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आता आगामी भारत दौऱ्यावरील संकट टळले आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20 व दोन कसोटी सामने खेळणार आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका यजमानांनी 3-0 अशी जिंकली. या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशचा सामना करणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली गेली.  ट्वेंटी-20 मालिकेसाठी जाहीर केलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे, तर कोहली कसोटी मालिकेपर्यंत विश्रांती घेणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघात संजू सॅम्सन आणि शिवम दुबे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताचा ट्वेंटी-20 संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर .

बांगलादेशचा ट्वेंटी-20 संघ - शकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.

ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक
3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20,  दिल्ली
7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर

भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत. 
14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता.

Web Title:  India vs Bangladesh; Know full schedule, time, date and venue in one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.