Join us  

India vs Bangladesh : इडन गार्डनवर होणाऱ्या डे-नाइट कसोटीची वेळ ठरली; बीसीसीआयची घोषणा

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूनं लागला. आता दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:23 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूनं लागला. आता दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 14 नोव्हेंबरला इंदूर येथे सुरू होणार आहे. पण, सर्वांना उत्सुकता लागली आहे ती दुसऱ्या कसोटीची.... कोलकाताच्या इडन गार्डनवर होणारी ही कसोटी डे-नाइट खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश प्रथमच डे नाइट कसोटी खेळणार आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी 50 हजाराहून अधिक तिकीटांची विक्रीही झाली आहे. आता हा सामना किती वाजता सुरू होईल, याबाबतची मोठी बातमी हाती आली आहे.

भारतातील वातावरणाचा विचार करता दवाचा फॅक्टर लक्षात घेऊन हा सामना विशिष्ट वेळेत खेळवण्यात यावा अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं केली होती. त्यांची ही मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) मान्य केली आहे. त्यानुसार 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत होणारा हा सामना दुपारी 1 वाजता सरू होईल आणि 8 वाजेपर्यंत संपेल, अशी घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. ''दवांचा फॅक्टर लक्षात घेता बीसीसीआयनं बंगाल क्रिकेट असोसिएसनची विनंती मान्य केली आहे. त्यानुसार 1 वाजता या सामन्याला सुरुवात होईल आणि पहिले सत्र 3 वाजता संपेल. दुसरे सत्र 3.40 ते 5.40 या वेळेत, तर अंतिम सत्र 6 ते 8 या वेळेत खेळवण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली.

यापूर्वी इडन गार्डनचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांनीही हा सामना 8 - 8.30च्या आधी संपवावा असा अंदाज व्यक्त केला होता. कारण त्यानंतर दव फॅक्टर त्रास दायक ठरू शकतो, असेही ते म्हणाले होते. 

भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत. 

14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता.

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय