Join us

Ind vs Ban, Day Night Test: विराटला वाटलं मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळेल, पण घडलं वेगळंच अन्...

भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 20:04 IST

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पुरस्कार वितरण सोहळ्यात कर्णधार कोहलीनं भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचे कौतुक केले. या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पुरस्कार आपल्याला मिळेल, असे विराटला वाटले होते. पण, तसे घडले नाही आणि त्यानंतर त्यानं मोठा खुलासा केला.

बांगलादेशच्या पहिल्या डावाच्या 106 धावांच्या उत्तरात भारतानं 9 बाद 347 धावा केल्या. विराट कोहलीनं गुलाबी कसोटीत शतक झळकावण्याच्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संपूर्ण संघ 195 धावांत तंबूत पाठवून भारतानं मालिका 2-0 अशी खिशात घातली. या सामन्या भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 19 विकेट्स घेतल्या. घरच्या मैदानावर एका कसोटीत जलदगती गोलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या विजयासह भारतीय संघानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 360 गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली.

या सामन्यानंतर विराट म्हणाला,''भारतीय गोलंदाजांचे कौतुक करायला हवं. ते कोणत्याही खेळपट्टीवर गोलंदाजी करू शकतात. फिरकीपटूंनीही चांगली कामगिरी केली. या गोलंदाजांमध्ये विकेट घेण्याची तीव्र भूक आहे.'' सामन्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार आपल्याला मिळेल, असे विराटला वाटलं होतं. त्याबाबत कोहलीनं खुलासा केला. तो म्हणाला,''जर मला हा पुरस्कार मिळाला असता, तर मी तो गोलंदाजांना दिला असता. या खेळपट्टीवर नऊ विकेट्स घेणं सोपी गोष्ट नाही.''  

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीइशांत शर्मा