भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर डावानं विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून भारतीय संघाने याही मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. भारतानं बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवताना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली.