Ind Vs Ban Day Night Test (2nd Day) Live News And Update : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो विराट कोहलीनं. टीम इंडियाच कर्णधार कोहलीनं शतकी खेळी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 27वे शतकं ठरलं. त्याला अजिंक्य रहाणेनं अर्धशतकी खेळी करताना चांगली साथ दिली. पण, कोहली माघारी परतल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना गुंडाळलं. भारतानं डाव घोषित करून पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली आहे. पण, बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या दिवसअखेर ते 89 धावांनी पिछाडीवर आहेत.
07:18 PM
बांगलादेशचा महमुदुल्लाहला दुखापत

01:54 PM

01:29 PM
