Join us

India vs Bangladesh, 3rd T20I : DRS घेण्यात रिषभ पंत पुन्हा चुकला अन् रोहितनं डोक्यावर हात मारला

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 22:21 IST

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी सुरुवातीला खेळपट्टीवर जम बसवला त्यानंतर तुफान फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशकडूनही दमदार खेळ झाला. मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याही सामन्यात रिषभ पंतनं निराश केलं आणि पुन्हा एकदा DRS वाया घालवला. त्यामुळे रोहित शर्मानं डोक्यावर हात मारला.

भारताच्या 5 बाद 174 धावांचा पाठलाग करताना दीपक चहरने तिसऱ्या षटकात बांगलादेशला दोन धक्के दिले. त्यानं लिटन दासला पहिले बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनं सुरेख झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर त्यानं सौम्या सरकारला माघारी पाठवलं. पण, मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी अर्धशतकी भागीदारी केली. नइमनं 34 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. युजवेंद्र चहलनं 12व्या षटकात नइमला धावबाद करण्याची संधी गमावली. या जोडीनं अर्धशतकी भागीदारीचं रुपांतर 98 धावांत केले. ही जोडी फोडण्यासाठी रोहितला दीपक चहरलाच पाचारण करावे लागले. चहरनं तो विस्वास सार्थ ठरवला आणि मिथूनला ( 27) माघारी पाठवले.

शिवम दुबेनं बांगलादेशचा हुकुमी एक्का मुश्फिकर रहीमला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे सामन्यानं अचानक कलाटणी घेतली. 15 व्या षटकात खलिल अहमच्या गोलंदाजीवर रिषभनं कर्णधार रोहितला DRS घेण्यास भाग पाडले. नको नको म्हणातानं रोहितनं अखेरच्या क्षणाला DRS घेतला, पण तो अयशस्वी ठरताच त्यानं डोक्यावर हात मारला.  

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मारिषभ पंत