Join us

India Vs Bangladesh, 1st Test : भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर दमदार विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 15:36 IST

Open in App

इंदूर : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर एक डाव आणि 130 धावांनी दमदार विजय मिळवला.

भारताने एकूण ३४३ धावांची आघाडी मिळवल्यानंतर बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले. पण दुसऱ्या डावातही बांगलादेशच्या फलंदाजांची पडझड पाहायला मिळाली. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत त्यांची उपहारापर्यंत ४ बाद ६० अशी स्थिती केली होती. त्यामुळे चहापानापर्यंत भारत विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटले होते.

दुसऱ्या सत्रात रहीमने दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा सामना केला. रहीमने चहापानापर्यंत सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ५३ धावांची खेळी साकारली होती. रहीमला मेहंदी हसनने नाबाद ३८ धावांची खेळी साकारत चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. भारताकडून सर्वाधिक बळी मोहम्मद शमीने पटकावले.

भारताच्या विजयाच्या मार्गात 'पराक्रमी' मुशफिकरचा अडसरभारतीय संघ आज चहापानापर्यंत विजय मिळवेल, असे भाकित काही जणांनी केले होते. पण भारताच्या या विजयाच्या मार्गात सध्या अडसर आहे तो बांगलादेशच्या 'पराक्रमी' मुशफिकर रहीमचा.

रहीमने चहापानापर्यंत अर्धशतक पूर्ण केले होते. रहीमने यावेळी जीवदानाचा पुरेपूर फायदा असल्याचे पाहायला मिळाले. कारण रहीमला चार धावांवर असताना जीवदान मिळाले होते. मोहम्मद शमीच्या १७व्या षटकात दुसऱ्या स्लीपमध्ये रोहितने रहीमचा झेल सोडला होता. हा झेल आता भारताला महागात पडल्याचे म्हटले जात आहे.

भारताविरुद्ध बांगलादेशच्या मुशफिकरने रचला इतिहास, केला 'हा' पराक्रमभारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात एक इतिहास लिहिला गेला आहे. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकर रहीमने भारताविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासक कामगिरी केली आहे.

रोहित शर्माने १७व्या षटकात रहीमला जीवदान दिले होते. त्यावेळी रहीम हा फक्त चार धावांवर होता. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहितने रहीमचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी रोहित दुसऱ्या स्लीपमध्ये होता.

या जीवदानाचचा पुरेपूर फायद रहीमने उचलल्याचे पाहायला मिळाले. या जीवदानानंतर रहीम स्थिरस्थावर झाला आणि त्याने त्यानंतर संयमी फलंदाजी केली. दोन अंकी धावसंख्या उभारत रहीमने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आता रहीमने आपल्या नावावर केला आहे.

भारताविरुद्धच्या आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये रहीमने चारशे धावांचा टप्पा पार केला आहे. भारताविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये चारशे धावा करणारा रहीम हा पहिला बांगलादेशचा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद अश्रफूलच्या नावावर होता. अश्रफूलने भारताविरुद्ध ३८६ धावा केल्या होत्या.

टॅग्स :मोहम्मद शामीभारत विरुद्ध बांगलादेश