Join us  

India vs Bangladesh, 1st T20I : रोहितच्या नेतृत्वाखाली भारत रचणार इतिहास, आजचा सामना आहे खास!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. या सामन्यावर हवा प्रदुषणाचे सावट आहे आणि सामना रद्दही होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 5:20 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. या सामन्यावर हवा प्रदुषणाचे सावट आहे आणि सामना रद्दही होण्याची शक्यता आहे. पण, जर हा सामना झाला, तर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी तो ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. आजच्या दिवसभरात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान असे दोन सामने झाले आणि भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा सामना होणार आहे.

Breaking : भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला सामना मॅच रेफरी रद्द करणार; चाहते निराश होणार?

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना आज खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 बाद 176 धावा केल्या. मार्टिन गुप्तील ( 41) आणि जिमी निशॅम ( 42) यांनी दमदार फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डेवीड मलान ( 39), कर्णधार इयॉन मॉर्गन ( 32) आणि ख्रिस जॉर्डन ( 36) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 155 धावांत तंबूत परतला. न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याला टीम साऊदी, ल्युक फर्ग्युसन आणि इश सोढी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्तम साथ दिली.

दुसरा सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. पावसामुळे हा सामना सुरुवातीला 15-15 षटकांचा खेळवण्यात आला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 107 धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने 59 धावा, तर मोहम्मद रिझवानने 31 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑसींनी 3.1 षटकांत 41 धावा चोपून काढल्या. अॅरोन फिंचने 16 चेंडूंत पाच चौकार व दोन षटकार खेचत 37 धावा चोपल्या. पण, त्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि सामना रद्द करावा लागला.

त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत विरुद्ध बांगलादेश संघाकडे लागले आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 1000 वा सामना ठरणार आहे. फेब्रुवारी 2005मध्ये पहिला ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात आला होता आणि 14 वर्षांत क्रिकेटच्या या फॉरमॅटनं 1000 सामन्यांचा पल्ला गाठला आणि भारत व बांगलादेश यांना तो ऐतिहासिक सामना खेळण्याचा मान मिळणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माआॅस्ट्रेलियाइंग्लंडपाकिस्तानन्यूझीलंड