Join us  

Ind vs Ban , Day Night Test : विराट कोहलीनं करून दाखवलं; टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला जमला नाही हा पराक्रम

India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटीच्या पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 12:58 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटीच्या पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर 3 बाद 174 अशी मजल मारली आहे. त्यामुळे भारताकडे पहिल्या दिवशीच ६८ धावांची आघाडी आहे. पहिल्या दिवशी पुजारानं 105 चेंडूंत 55 धावा केल्या. कर्णधार विराट 59 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवशी विराटनं असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला जमला नाही. शिवाय विराटनं ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचाही विक्रम मोडला.

इशांत शर्मा ( 5/22), उमेश यादव ( 3/29) आणि मोहम्मद शमी ( 2/36) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत गुंडाळला. बांगलादेशकडून शदमन इस्लाम ( 29) आणि लिटन दास ( 24) यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर भारताच्या सलामीवीरांना अपयश आलं. मयांक अग्रवाल ( 14) आणि रोहित शर्मा ( 21) छोटेखानी खेळी केली. पण, पुजारा व विराटनं संघाचा डाव सावरला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना भारताला आघाडी मिळवून दिली. पुजाराला इबादत होसैननं माघारी पाठवलं, परंतु विराट खेळपट्टीवर नांगर रोवून होता. 

विराटनं या सामन्यांत कर्णधार म्हणून कसोटीत 5000 धावांचा पल्ला पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. शिवाय त्यानं सर्वात जलद हा टप्पा पार करण्याचा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. 

सर्वात जलद 5000 धावा करणारे कर्णधार86* डाव - विराट कोहली97 डाव - रिकी पाँटिंग106 डाव - क्लाईव्ह लॉईड110 डाव - ग्रॅमी स्मिथ116 डाव - अ‍ॅलन बॉर्डर 

सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधारविराट कोहली - 86* डाव - 5027 धावामहेंद्रसिंग धोनी - 96 डाव - 3454 धावासुनील गावस्कर - 74 डाव - 3449 धावामोहम्मद अझरुद्दीन - 68 डाव - 2856 धावासौरव गांगुली - 75 डाव - 2561 धावा 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीसुनील गावसकरसौरभ गांगुली