India vs Australia: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत Virat Kohli शतक ठोकणार; 'या' दिग्गजाने केली भविष्यवाणी

India vs Australia: येत्या 9 फेब्रुवारीपासून प्रतिष्ठित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:22 PM2023-02-03T15:22:00+5:302023-02-03T15:23:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: Virat Kohli will score century in Border Gavaskar Trophy; sanjay bangar predicted | India vs Australia: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत Virat Kohli शतक ठोकणार; 'या' दिग्गजाने केली भविष्यवाणी

India vs Australia: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत Virat Kohli शतक ठोकणार; 'या' दिग्गजाने केली भविष्यवाणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्‍या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border Gavaskar Trophy) 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) कसोटी फॉरमॅटमध्ये आपल्या शतकांचा दुष्काळ संपवू शकेल का?

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेपूर्वी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. कोहली प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, त्याच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोहलीने रेड बॉल क्रिकेटमधील शेवटचे शतक 2019 मध्ये झळकले होते.

कोहलीबद्दल संजय बांगरचे भाकीत:
ऑस्ट्रेलियाविरुद्धची प्रतिष्ठित मालिका सुरू होण्यापूर्वी माजी क्रिकेटपटू संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी कोहलीबद्दल मोठे भाकीत केले आहे. स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना बांगर म्हणाले की, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली आपल्या शतकांचा दुष्काळ नक्कीच संपवेल. आगामी सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीची जबरदस्त कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहली नेहमी चांगली कामगिरी करतो. यापूर्वीच्या कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीने 20 सामने खेळताना 36 डावांत 48.05 च्या सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात शतके आणि पाच अर्धशतके झळकली आहेत.

Web Title: India vs Australia: Virat Kohli will score century in Border Gavaskar Trophy; sanjay bangar predicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.