Join us  

India vs Australia Test Series: आर अश्विनचा डुप्लीकेट, ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत करतोय नेट प्रॅक्टिस; पाहा Video...

India vs Australia Test Series: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विनचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने अनोखी शक्कल लढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 6:27 PM

Open in App

India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपुरात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या मालिकेत एक मोठी भीती ऑस्ट्रेलियन संघाला सतावत आहे. ही भीती म्हणजे भारतीय संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने अतिशय अनोखा मार्ग अवलंबला आहे. त्यांना अश्विनचा डुप्लिकेट सापडला असून, त्याच्यासोबत सध्या नेट प्रॅक्टिस सुरू आहे.

जुनागडचा पिठिया अश्विनचा डुप्लिकेट21 वर्षीय फिरकीपटू महेश पिठिया गुजरातच्या जुनागढचा रहिवासी आहे. पिठिया अश्विनला आपला आदर्श मानतो. विशेष म्हणजे, पिठियाची बॉलिंग स्टाईल अश्विनसारखीच आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाने पिठियाला त्यांच्या शिबिरात नेट प्रॅक्टिससाठी बोलावले आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या बंगळुरुमध्ये सराव करत असून, पिठिया तिथेच गेला आहे. ऑस्ट्रेलियन संघ अलूर येथील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सराव करत आहे. येथील खेळपट्ट्या खास फिरकीसाठी तयार करण्यात आल्या आहेत.

महेश पिठिया कोण आहे?पिथियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बडोद्याकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. पिथियाने आतापर्यंत फक्त 4 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 7 डावात 8 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनप्रमाणेच पिथियामध्येही फलंदाजीत चमत्कार दाखवण्याची क्षमता आहे. अश्विनला भेटून टीम इंडियाकडून खेळण्याचे पिथियाचे स्वप्न आहे. चाहत्यांना लवकरच पिठिया आयपीएलमध्येही पाहता येणार आहे. अश्विनची गोलंदाजी पहिल्यानंतर त्याने तशाच स्टाईलने बॉलिंग सुरू केली. तो अश्विनला आपला आदर्शही मानतो.

पिठियाने या दिग्गजांना गोलंदाजी केलीसराव सत्रात पिथियाने स्टिव्ह स्मिथ, मार्नस लबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड सारख्या दिग्गज फलंदाजांना बॉलिंग केली. कोणताच फिरकीपटू अश्विनच्या बॉलिंगची बरोबरी करू शकत नाही, त्यामुळे पिथियासोबतचा सरा ऑस्ट्रेलियन संघाला किती फायेदशीर ठरतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक:

पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी - 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशालाचौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाऑफ द फिल्ड
Open in App