Join us

IND vs AUS: दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठ्ठा निर्णय! चार नव्या खेळाडूंना भारतात बोलावलं, पाहा संघ

स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल सारख्या खेळाडूंना देणार विश्रांती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:11 IST

Open in App

Australia Updated Squad for IND vs AUS T20 Series: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सुरू असलेल्या उर्वरित टी२० मालिकेसाठी त्यांच्या संघात अनेक बदल केले आहेत. शेवटच्या तीन सामन्यांसाठी त्यांनी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या संघातील सहा खेळाडूंना त्यांच्या कामाचा ताण मॅनेज करण्यासाठी भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत आजपासून स्टीव्ह स्मिथ आणि अडम झम्पा यांना विश्रांती दिली गेली आहे. तसेच गुवाहाटीतील तिसऱ्या टी२० नंतर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि शॉन एबॉट या चौघांना विश्रांती दिली जाणार आहे.

उर्वरित टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: मॅथ्यू वेड (क), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन

ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि अडम झम्पा यांना भारताविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांतून वगळले आहे. ऑस्ट्रेलिया संघाची आगामी कसोटी मालिका असल्याचे लक्षात घेत, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोघांनी विश्रांती देण्याचे ठरवले आहे. तसेच, शेवटच्या दोन सामन्यांसाठी देखील काही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन एबॉट आणि जोश इंग्लिश यांच्या त्यात समावेश आहे. या खेळाडूंच्या जागी बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, बेन द्वारशुइस आणि ख्रिस ग्रीन हे भारतात दाखल होऊन ऑस्ट्रेलियन संघात सामील होणार आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेलस्टीव्हन स्मिथ