Join us

India vs Australia : 'कॅप्टन कूल' धोनी कांगारूंचं कंबरडं मोडणार, यष्टिरक्षक म्हणून विश्वविक्रम नोंदवणार

India vs Australia: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 2019 ची दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 13:29 IST

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 2019 ची दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतक, सामनावीरचा पुरस्कार आणि त्यानंतर न्यूझीलंड मालिकेत फटकेबाजी करत धोनीनं टीकाकारांची बोलती बंद केली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि याही मालिकेत कॅप्टन कूल धोनी कांगारूंचं कंबरडं मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत धोनीला विश्वविक्रम नोंदवून दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरला मागे टाकण्याची संधी आहे. 

( India vs Australia : ऑसींविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती, टीम इंडियात या खेळाडूंचे कमबॅक) ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे.

( India vs Australia : वीरेंद्र सेहवागची बेबी सीटिंग, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू खवळला )धोनीच्या नावे असंख्य विक्रम आहेत. भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून देण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने खेळल्यात धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा यष्टिरक्षक म्हणून धोनीच्या नावे विक्रम नोंदवला जाणार आहे. बाऊचरच्या नावावर 596 आंतरराष्ट्रीय सामने आहेत, तर धोनी ( 594) दोन सामन्यांच्या पिछाडीने दुसऱ्या स्थानावर आहे. या विक्रमात श्रीलंकेचा कुमार संगकारा ( 499) आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट ( 485) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

( 2019च्या वर्ल्ड कपनंतरही धोनी भारताचे प्रतिनिधित्व करणार का? निवड समिती प्रमुखांनी दिलं उत्तर )

( विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान )

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया