India vs Australia: Rohit Sharma's will be rested in India’s home series against Australia | India vs Australia : ऑसींविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती, टीम इंडियात या खेळाडूंचे कमबॅक
India vs Australia : ऑसींविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती, टीम इंडियात या खेळाडूंचे कमबॅक

ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा संघ 2 ट्वेंटी-20 व पाच वन डे खेळणाररोहित शर्माला विश्रांती, विराट कोहलीचे कमबॅकअजिंक्य रहाणे व लोकेश राहुलला अखेरची संधी

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि वन डे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ कांगारूंचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. 
( India vs Australia : वीरेंद्र सेहवागची बेबी सीटिंग, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू खवळला )

मात्र, वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे. विश्रांती देणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे आणि लोकेश राहुल व अजिंक्य रहाणे संघात कमबॅक करण्याची शक्यता आहे. याआधी कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या दोन वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. 

( विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान )

कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात कमबॅक करू शकतो. द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ऑसींविरुद्ध कोहली व रोहित या दोघांना विश्रांती दिल्यास कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व सांभाळेल. वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील. 

मर्यादित षटकांच्या सामन्यांत कुलदीप यादव व युजवेंद्र चहल ही जोडी धुमाकूळ घालत आहे. मात्र, त्यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराचे कमबॅक होऊ शकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे  मालिकेत आणि संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशात भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांना विश्रांती मिळू शकते.

( पाकिस्तानविरुद्ध न खेळणं भारताला पडू शकतं महागात, वर्ल्ड कप प्रवेश धोक्यात )

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. 


Web Title: India vs Australia: Rohit Sharma's will be rested in India’s home series against Australia
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.