Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs Australia : भारतीय संघ नागपूरला दाखल

दुसरा एकदिवसीय सामना 5 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 20:12 IST

Open in App

नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  : हैदराबाद येथे पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियालर विजय मिळवला. या विजयानंतर भारताचा संघ नागपूर येथे दुसऱ्या सामन्यासाठी पोहोचला आहे. दुसरा एकदिवसीय सामना 5 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबरोबरचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हैदराबादहून नागपूरला दुसऱ्या एकदिवसीय भारतीय संघ रवाना होत असताना कोहलीने हा फोटो काढला आणि इंस्टाग्रामवर शेअर केला. कोहलीने हा फोटो शेअर करताना शमीला पेस मशिन म्हटले आहे.

महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वात चांगला फिनीशर का आहे, याचे उत्तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळाले. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन हे नावाजलेले फलंदाज शंभरी पार होण्यापूर्वीच बाद झाले होते. पण धोनीने केदार जाधवच्यासाथीनेभारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण केले.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. शिखर धवनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर रोहित आणि कोहली यांनी ७६ धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे १५ धावांच्या फरकाने बाद झाले. त्यानंतर अंबाती रायुडूही झटपट बाद झाला आणि भारताची ४ बाद ९९ अशी अवस्था झाली. त्यानंतर धोनीने केदारला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. केदारने या सामन्यात  ८७ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८१ धावा केल्या. धोनीने ७२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या.

झेल सुटला आणि स्टेडियममध्ये धोनी, धोनी हा नाद घुमला...महेंद्रसिंग धोनी हा एक निष्णात यष्टीरक्षक आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक झेल सुटला आणि स्टेडियममध्ये धोनी, धोनी हा नाद घुमला. 

ही गोष्ट आहे ३८व्या षटकातली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनीने मिड ऑनला षटकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर धोनीचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्यासाठी मार्कस स्टॉइनिस झेपावला. हा चेंडू स्टॉइनिसने टिपला. त्यावेळी प्रेक्षकांना वाटले की धोनी बाद झाला. पण मैदानावरील पंच कुमार धर्मसेना यांनी यावेळी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचे ठरवले. तिसऱ्या पंचांनी अॅक्शन रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा हा चेंडू प्रथम जमिनीला लागला होता आणि त्यानंतर तो स्टॉइनिसच्या हातामध्ये विसावला होता. हे पाहून तिसऱ्या पंचांनी धोनीला नाबद ठरवले. धर्मसेना यांनी जेव्हा धोनी नाबाद असल्याचे सांगितले तेव्हा मैदानात धोनी, धोनी हा नाद घुमायला सुरुवात झाली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियानागपूर