मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या खेळपट्टीवर धोनीने एका बाजूने संयमी खेळ करताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार केले. धोनीने नाबाद 87 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( 46) आणि केदार जाधव ( नाबाद 61 ) यांनीही विजयात हातभार लावला. भारताने 49.2 षटकांत 3 बाद 234 धावा केल्या.
05:05 PM
भारताचा ऐतिहासिक मालिका विजय
04:15 PM
केदार जाधवचे अर्धशतक, भारताला विजयासाठी हव्यात 14 धावा
04:07 PM
केदार जाधवचे अर्धशतक, भारताला विजयासाठी हव्यात 14 धावा
04:05 PM
'कॅप्टन कूल' धोनीनं तिसऱ्यांदा जुळवून आणला 'हा' योगायोग http://www.
03:08 PM
भारताच्या 150 धावा
03:06 PM
सलग तिसऱ्या वन डे सामन्यात धोनीचे अर्धशतक
02:28 PM
कर्णधार विराट कोहली माघारी, झाय रिचर्डसनने महत्त्वाचा बळी टिपला
01:34 PM
महेंद्रसिंग धोनीचा सोपा झेल मॅक्सवेलने टाकला
01:31 PM
शिखर धवन बाद, भारताला दुसरा धक्का
01:18 PM
चहलच्या विक्रमी कामगिरीवर सेहवागचे धमाकेदार ट्विट....
01:17 PM
युजवेंद्र चहलचा परफॉर्मन्स एकदम कडsssssक..
01:17 PM
रवी शास्त्रींना मिळाला महागुरू; चहलने मोडला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम
01:16 PM
विराट कोहलीचा झेल सोडणे पडू शकते महागात
01:12 PM
हिटमॅन रोहित शर्माची विकेट पाहा
12:51 PM
भारताला पहिला धक्का, हिटमॅन रोहित शर्मा बाद
11:49 AM
ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावावंर आटोपला
11:37 AM
युजवेंद्र चहलाचा पराक्रम, ऑसीचा निम्मा संघ गुंडाळला
11:27 AM
धोनीसमोर चाचपडलात तर बाद झालात, माहीचा ऑसींविरुद्ध पराक्रम
11:26 AM
ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज बाद
11:22 AM
पीटर हँड्सकोम्बचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा
10:45 AM
ग्लेन मॅक्सवेल आऊट, मोहम्मद शमीने मिळवून दिली मोठी विकेट
10:27 AM
धोनीनं केलेली स्पम्पींग पाहा
10:24 AM
चहलला आणखी एक यश, ऑसींचा निम्मा संघ माघारी
10:18 AM
ऑस्ट्रेलियाच्या 28 षटकात 4 बाद 115 धावा
10:02 AM
उस्मान ख्वाजाचा सोपा झेल, चहलचे एका षटकात दोन धक्के
10:00 AM
उस्मान ख्वाजा व शॉन मार्शची भागीदारी संपुष्टात
09:58 AM
भारत आर्मीचा जल्लोष
09:57 AM
ऑस्ट्रेलिया शतकासमीप
09:56 AM
भुवनेश्वर कुमारची आयडियाची कल्पना, फिंचला बाद करण्यासाठी लढवली शक्कल
09:05 AM
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, फिंच माघारी
08:41 AM
भुवनेश्वर कुमारनं भारताला मिळवून दिलं पहिलं यश; कॅरी 5 धावा काढून बाद
08:39 AM
कांगारुंना पहिला धक्का; ऍलेक्स कॅरी स्वस्तात माघारी
08:23 AM
थोड्याच वेळात खेळ पुन्हा सुरू होणार; डिनर ब्रेक 30 मिनिटांचा असणार
08:13 AM
पावसामुळे खेळ थांबला
07:51 AM
ऑस्ट्रेलियन संघ : अॅरोन फिंच (कर्णधार), अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँडस्कोम्ब, मार्कस् स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, पीटर सिडल, बिली स्टानलेक, अॅडम झम्पा.
07:40 AM
भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), एम. एस. धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल
07:35 AM
भारतानं टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
07:34 AM
विजय शंकरचं टीम इंडियात पदार्पण