ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उमटविले विश्वचषकावर नाव; भारताला 85 धावांनी केले पराभूत

ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलिया संघाने महिला टी-२० विश्वचषकात भारताला पराभूत करुन पाचव्यांदा विश्वचषक पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:27 AM2020-03-08T11:27:58+5:302020-03-08T15:43:27+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Australia ICC Women's T20 World Cup, Final Live Score Updates, IND Vs AUS Highlights and Commentary in Marathi svg | ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उमटविले विश्वचषकावर नाव; भारताला 85 धावांनी केले पराभूत

ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उमटविले विश्वचषकावर नाव; भारताला 85 धावांनी केले पराभूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's T20 World Cup, Final: महिला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने देखील  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करत पहिल्यांदाज जेतेपद पटकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय संघाला यावेळी अपयश आले आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला. 

महत्त्वाच्या बातम्या

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?

Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान

अ‍ॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

'या' दोन मोठ्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या, अन्यथा....

LIVE UPDATES-

-ऑस्ट्रेलिया संघाने महिला टी-२० विश्वचषकात भारताला पराभूत करुन पाचव्यांदा विश्वचषक पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला. 

- ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज शूट्टने शिखा पांडेसह रिचा घोषला बाद करत एकाच षटकांत दोन विकेट्स घेत भारताला आठवा धक्का दिला. 

- दीप्ती शर्माने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज कॅरीने दीप्तीला 33 धावांवर बाद केले.

-वेदा कृष्णमुर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी काही काळ खेळपट्टीवर खिंड लढवली. परंतु १२ व्या षटकात वेदा झेलबाद झाली. भारताची अखेरच्या आशाही मावळल्या. 

- भारतीय संघानं पहिल्या १० षटकांत ४ बाद ५१ धावा केल्या आहेत. विजयासाठी त्यांना ६० चेंडूंत १३१ धावांची गरज आहे.

Image

- लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. स्पर्धेत आतापर्यंत तुफानी खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला दडपणात अपयश आले. मीगन स्कटच्या चेंडूवर चिकी फटका मारण्याचा तिचा बेत चुकला आणि यष्टिरक्षक हिलीनं सुरेख झेल टिपला. त्यानंतर आलेली तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली. जेमिमा रॉड्रीग्ज ( ०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( ४ ) यांनाही जेस जॉनासेननं बाद केले. स्मृती मानधनाचे अपयशाचे सत्र अंतिम सामन्यातही कायम राहिले. ती ११ धावा करून सोफी मोलिनेक्सच्या गोलंदाजीवर बाद झाली.

 हिलीनंतर मूनी बरसली, टीम इंडियासमोर डोंगराएवढं आव्हान

- बेथ मूनीनंही वाहत्या गंगेत हात धुतले.

- ऑसी कर्णधार मेन लॅनिंग १६ धावा करून माघारी परतली. दीप्ती शर्मानं तिला बाद केले. त्याच षटकात दीप्तीनं ऑसींना आणखी एक धक्का दिला. गार्डनर दोन धावा करून यष्टिचीत झाली. 

- ऑसी कर्णधार मेन लॅनिंग १६ धावा करून माघारी परतली. दीप्ती शर्मानं तिला बाद केले. 

-बेथ मूनीनंही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे तिचे ९वे अर्धशतक ठरले. 

-राधा यादवने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तिनं हिलीला वेदा कृष्णमुर्तीकरवी झेलबाद केले. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१६च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर आणि हिली मॅथ्यू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० धावा चोपल्या होत्या. 

- हिलीनं आठव्या षटकात राजेश्वरीच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत षटकार खेचून चाहत्यांची वाहवाह मिळवली. हिलीनं ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. तिचे हे ट्वेंटी-२०तील १२ वे अर्धशतक ठरले. 

-चौथ्या षटकात राजेश्वरी गायकवाडने तिच्याच गोलंदाजीवर बेथ मूनाच सोपा झेल सोडला. 

-हिलीने बेथ मूनीसह फटकेबाजी सुरूच ठेवली. हिलीनं दीप्तीच्या दुसऱ्या षटकात ९ धावा कुटल्या. 

-अॅलिसा हिलीनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारी ती दुसरी ऑस्ट्रेलियन, तर एकूण ११ वी फलंदाज ठरली आहे. 

- टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यासाठी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माकडे चेंडू सोपवला. अॅलिसा हिलीनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून तिचे स्वागत केले. पण, पाचव्याच चेंडूवर शेफाली वर्मानं हिलीचा सोपा झेल सोडला. ऑसींनी पहिल्याच षटकात १४ धावा खेचल्या.

-हरमनप्रीत कौर म्हणते,''आम्हालाही प्रथम फलंदाजी करायला आवडले असते, परंतु आम्ही लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करू, असा विश्वास आहे. गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांच्या धावांवर लगाम लावला पाहिजे आणि ते आमच्या फायद्याचे असेल.''

- कॅटी पेरीचा दमदार परफॉर्मन्स

- दोन्ही देशांच्या प्रमुखांनी दिल्या शुभेच्छा

- माजी कर्णधार मिताली राजनं केल्या शेफाली वर्माला महत्त्वाच्या सूचना

-ऑस्ट्रेलियाचा संघ 

Image

Image

- भारतीय संघ - शेफाली वर्मा, स्मृती मानधना, तानिया भाटिया ( यष्टिरक्षक), जेमिमा रॉड्रीग्ज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड

- भारतीय संघाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार

- ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांची आमनेसामने कामगिरी

- पाहा टीम इंडियाचा आतापर्यंतचा प्रवास

 

Web Title: India Vs Australia ICC Women's T20 World Cup, Final Live Score Updates, IND Vs AUS Highlights and Commentary in Marathi svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.