सिडनीच्या मैदानात पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी टीम इंडियात मोठी उलथापालथ झाली. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या कॅप्टन रोहित शर्माऐवजी बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला. रोहितसाठी अन् चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्काच आहे. टॉस जिंकून टीम इंडियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. पण या दोघांना संघाला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयश आले. संघाच्या धावफलकावर अवघ्या ११ धावा असताना लोकेश राहुलच्या रुपात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला पहिला धक्का दिला.
अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला KL राहुल
मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने फक्त ४ धावांची भर घातली. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं दुहेरी आकडा गाठला. पण बोलँडच्या गोलंदाजीवर तो देखील १० धावांवर फसला अन् सिडनीत गुड मॉर्निग फॉर इंडिया म्हणण्याऐवजी बॅड मॉर्निंग फॉर टीम इंडिया अँँण्ड बुमराह कंपनी इन सिडनी असा काहीसा सीन क्रिएट झाला आहे.
यशस्वीच्या रुपात टीम इंडियानं गमावली दुसरी विकेट
१७ धावा असताना टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. पहिल्या ड्रिंक्स ब्रेकपर्यंत टीम इंडियानं १२ षटकात २ बाद ३२ धावा केल्या होत्या. शुबमन गिल ९(२०) आणि विराट कोहली ८ (१२) ही जोडी मैदानात असून त्यांच्यावर संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी आहे.