India vs Australia 5th Test Rohit Sharma dropped Jasprit Bumrah to captain Of Team India : बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मालिकेदरम्यान भारतीय कॅप्टनला बाकावर बसवण्यात आल्याचा सीन पाहायला मिळतोय. सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराह टॉसला आला अन् रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार नाही हे अधिकृतरित्या स्पष्ट झाले. रोहितला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार ही चर्चा खरी ठरली. त्याच्या जागी शुबमन गिलची संघात एन्ट्री झाली आहे.
रोहितला विश्रांती की, डच्चू?
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात याआधी कधीही मालिका सुरु असताना कॅप्टनला बाहेर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठी उलथापालथ आहे, असे म्हणता येईल. रोहित शर्माला विश्रांती दिलीये की डच्चू हा एक चर्चेचा विषय ठरू शकतो. पण सध्याच्या घडीला जे चित्र दिसतंय ते टीम इंडियातून त्याला संघातून डच्चू देण्यात आलाय असाच आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातच पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाने या मालिकेत विजयी सलामी दिली. आता रोहितला बाकावर बसवल्यानंतर टॉस जिंकल्यावर भारतीय संघ सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियात दोन बदल, प्रसिद्ध कृष्णालाही मिळाली संधी
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार),प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.