Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 4th T20I : टीम इंडियाचा 'सेम गेम प्लॅन'! ऑस्ट्रेलियानं मॅक्सवेलसह झाम्पावर खेळला डाव

सूर्यानं नाणेफेक गमावली तरी सगळं मनासारखं घडलं असं बोलून दाखवलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:40 IST

Open in App

India vs Australia 4th T20I  :भारत विरुद्ध  ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना क्विन्सलँड येथील  कॅरारा ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शच्या बाजूनं लागला. त्याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मैदानात  पहिल्यांदा फलंदाजीला पसंती दिली असती, असे म्हणत सूर्यानं नाणेफेक गमावली तरी सगळं मनासारखं घडलं असं बोलून दाखवलं.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघ सेम प्लॅनसह उतरला मैदानात, ऑस्ट्रेलियानं खेळला हा डाव

भारतीय संघ या सामन्यात कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघातून ट्रॅविस हेड संघाबाहेर झाला असला तरी ग्लेन मॅक्सवेल मैदानात उतरण्यास सज्ज आहे. याशिवाय ॲडम झाम्पाच्या फिरकीचंही टीम इंडियासमोर चॅलेंज असेल. 

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : 

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (क), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (w), शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन

मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा 

English
हिंदी सारांश
Web Title : India vs Australia 4th T20I: India unchanged, Australia banks on Maxwell, Zampa.

Web Summary : Australia won the toss and chose to field first in the fourth T20I. India remains unchanged. Australia includes Maxwell, relying on Zampa's spin against India.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार यादवग्लेन मॅक्सवेल