Join us

IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

टिम डेविडनं मोडला सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम; एका वर्षात सर्वाधिक सिक्सरचाही साधला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 16:12 IST

Open in App

IND vs AUS, Tim David  Past Suryakumar Yadav And Set Unique T20I Record : ऑस्ट्रेलियाचा पॉवर हिटर टिम डेविड याने होबार्टच्या मैदानात रंगलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात धमाकेदार फटकेबाजीचा नजराणा पेश केला.    मालिकेत १-० अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला धक्क्यावर धक्के दिले. अर्शदीप सिंगनं स्फोटक सलामीवीर ट्रॅविस हेड ६ (४) आणि जोश इंग्लिस १ (७) यानां  स्वस्तात तंबूत धाडले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टिम डेविडनं मोडला सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या संघाने १४ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. मग होबार्टच्या मैदानात टिम डेविड नावाचं वादळ घोंगावलं. तुफान फटकेबाजी करत त्याने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो या सामन्यात शतकी खेळी करण्याच्या मूडमध्ये दिसत होता.शिवम दुबेनं त्याच्या खेळीला ब्रेक लावत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. या सामन्यात टिम डेविडनं ३८ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. 

AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!

सर्वात जलद हजार धावांसह सेट केला नवा विक्रम

टिम डेविड याच्यासाठी २०२५ हे वर्ष एकदम खास ठरलं आहे. यंदाच्या वर्षात तुफान फटकेबाजीसह त्याने आतापर्यंत २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटताना ३६३  धावा केल्या आहेत. प्रत्येक सामन्यात एखादा खास विक्रम आपल्या नावे करणाऱ्या टीम डेविडनं भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा टप्पा पार करण्याचा डाव साधला. या कामगिरीसह त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ५७३ चेंडू खेळले होते. टिम डेविडनं ५६९ चेंडूत हा पराक्रम करून दाखवला आहे. होबार्टच्या बेलरीव्ह ओव्हल मैदानात टी-२० मध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा खास विक्रमही टीम डेविडनं आपल्या नावे केल्याचे पाहायला मिळाले. 

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वात जलद १,००० धावा करणारे फलंदाज (कमी चेंडूत)

५६९ चेंडू – टिम डेविड (ऑस्ट्रेलिया)५७३ चेंडू – सूर्यकुमार यादव (भारत)६०४ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)६११ चेंडू – फिन अ‍ॅलन (न्यूझीलंड) 

एका कॅलेंडर ईयरमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

३५ – टिम डेविड, २०२५**३३ – ट्रॅव्हिस हेड, २०२४३१ – आरोन फिंच, २०१८२९ – मिचेल मार्श, २०२५*

English
हिंदी सारांश
Web Title : Tim David's blistering innings breaks Suryakumar Yadav's record in IND vs AUS.

Web Summary : Tim David's explosive batting against India shattered Suryakumar Yadav's record for fastest 1000 T20I runs. He scored 76 off 38 balls, surpassing Yadav's milestone and setting a new Australian record with a rapidfire innings of boundaries and sixes, showcasing his power-hitting prowess.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार यादव