Join us  

India Vs Australia : भारताचा दणदणीत विजय, मालिका 2-1नं जिंकली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली. शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या लोकेश राहुल ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 1:00 PM

Open in App

19 Jan, 20 09:10 PM

19 Jan, 20 08:14 PM

रोहित आणि विराट जोडीनं त्यानंतर दमदार खेळ करताना शतकी भागीदारी केली. रोहितनं 110 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील रोहितचे हे 29वे शतक ठरले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं आठव्यांदा शतकी खेळी केली आहे. विराटनंही 61 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 37व्या षटकात रोहित-विराट यांची जोडी तुटली. अॅडम झम्पानं शतकवीर रोहितला बाद केले. रोहित 128 चेंडूंत 8 चौकार व 6 षटकार खेचून 119 धावांवर माघारी परतला. 

19 Jan, 20 08:06 PM

19 Jan, 20 07:57 PM

रोहित शर्माचा कोणता षटकार तुम्हाला आवडला? Video

19 Jan, 20 07:50 PM

19 Jan, 20 07:47 PM

19 Jan, 20 07:46 PM

वन डे क्रिकेटमधील रोहितचे हे 29वे शतक ठरले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं आठव्यांदा शतकी खेळी केली आहे. या सह त्यानं सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 8 शतकं करण्याचा विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध, तर विराटनं श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. 

19 Jan, 20 07:44 PM

19 Jan, 20 07:36 PM

19 Jan, 20 06:52 PM

19 Jan, 20 06:51 PM

19 Jan, 20 06:32 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितनं या सामन्यात दुसऱ्याच षटकात एक पराक्रम केला. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला. पण, वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारा जगातला तिसरा फलंदाज बनण्याचा मान त्यानं पटकावला. रोहितनं 217 डावांमध्ये हा पल्ला सर करताना माजी कर्णधार सौरव गांगुलीचा ( 228 डाव) आणि सचिन तेंडुलकरच ( 235 डाव) विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली ( 194 डाव) आणि एबी डिव्हिलियर्स ( 205 डाव) अव्वल दोन क्रमांकावर आहे. 

19 Jan, 20 05:22 PM

19 Jan, 20 04:40 PM

19 Jan, 20 04:39 PM

19 Jan, 20 04:39 PM

पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करण्यासाठी पाठवलेल्या मिचेल स्टार्कला काही कमाल करता आली नाही. जडेजानं त्यालाही बाद केले. पण, त्यानंतर आलेल्या अॅलेक्स करीनं स्मिथसोबत पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कुलदीप यादवनं ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानं करीला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. करीनं 36 चेंडूंत 35 धावा केल्या. स्मिथनं 117 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे वन डेतील 9 वे शतक ठरले. 
 

19 Jan, 20 04:33 PM

19 Jan, 20 04:27 PM

19 Jan, 20 03:28 PM

स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. स्मिथनं 63 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या जोडीनं अर्धशतकी भागीदारीचे शतकात रुपांतर करताना ऑसींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 

19 Jan, 20 03:17 PM

19 Jan, 20 03:14 PM

19 Jan, 20 03:00 PM

स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 

19 Jan, 20 01:50 PM

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संयमी सुरुवात केली. पण, मोहम्मद शमीनं चतुराईनं वॉर्नरचा अडथळा दूर केला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर ( 3) यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला 19 धावांवर पहिला धक्का बसला. 

19 Jan, 20 01:33 PM

19 Jan, 20 01:09 PM

19 Jan, 20 01:08 PM

19 Jan, 20 01:07 PM

ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल, जोश हेझलवूडची एन्ट्री, केन रिचर्डसन बाहेर

19 Jan, 20 01:07 PM

भारतीय संघात बदल नाही

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्मामोहम्मद शामीलोकेश राहुल