India vs Australia, 3rd ODI: Steve Smith has run out his captain, Aaron Finch is not happy | India vs Australia, 3rd ODI: स्टीव्ह स्मिथनं कर्णधार फिंचला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं

India vs Australia, 3rd ODI: स्टीव्ह स्मिथनं कर्णधार फिंचला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संयमी सुरुवात केली. पण, मोहम्मद शमीनं चतुराईनं वॉर्नरचा अडथळा दूर केला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर ( 3) यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला 19 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर फिंच आणि स्टीव्ह स्मिथ डाव सावरतील असे वाटले होते, पण या जोडीला समन्वय राखता आला नाही. मोहम्मद शमीनं भारताला दुसरे यश मिळवून दिले.
 

पाहा व्हिडीओ...

नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्मिथनं फटका मारल्यानंतर धाव घेण्यासाठी आवाज दिला. फिंचनं तोपर्यंत क्रीज सोडली होती आणि चेंडू भारतीय फलंदाजाच्या हातात असल्याचे दिसताच स्मिथ पुन्ही क्रीजवर परतला. फिंच तोपर्यंत खूप पुढे आला होता आणि त्ला धावबाद व्हावे लागले. त्यानंतर फिंच स्मिथच्या दिशेनं आरडाओरड करताना तंबूत गेला. ऑस्ट्रेलियानं 10 षटकांत 2 बाद 56 धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ..

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia, 3rd ODI: Steve Smith has run out his captain, Aaron Finch is not happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.