भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मानं अर्धशतक पूर्ण केलं. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे 44वे अर्धशतक ठरले आणि या कामगिरीसह त्यानं विराट कोहलीच्या नावावर असलेला विक्रम मोडला. 


स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. जसप्रीत बुमराहचा टिच्चून मारा आणि मोहम्मद शमीनं दिलेली धक्के यामुळे टीम इंडियानं पाहुण्यांना 9 बाद 286 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.  स्मिथनं 132 चेंडूंत 14 चौकार आणि 1 षटकारासह 131 धावा केल्या. स्मिथला मार्नस लाबुशेनची चांगली साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावा जोडल्या. पण, त्यानंतर अॅलेक्स करी ( 35) वगळता स्मिथला हवी तशी साथ मिळाली नाही. स्मिथ व करी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं दोन, तर नवदीप सैनी व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. 


लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितनं या सामन्यात दुसऱ्याच षटकात एक पराक्रम केला. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला. पण, वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारा जगातला तिसरा फलंदाज बनण्याचा मान त्यानं पटकावला. रोहितनं 217 डावांमध्ये हा पल्ला सर करताना माजी कर्णधार सौरव गांगुलीचा ( 228 डाव) आणि सचिन तेंडुलकरच ( 235 डाव) विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली ( 194 डाव) आणि एबी डिव्हिलियर्स ( 205 डाव) अव्वल दोन क्रमांकावर आहे. 


शिखर धवनच्या अनुपस्थितीत रोहितसह लोकेश राहुल सलामीला आला. दोघांनी ऑसी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण, 13व्या षटकात ही जोडी तुटली. अॅस्टन अॅगरनं लोकेशला पायचीत केले. लोकेश 19 धावांवर माघारी परतला. रोहित-लोकेशनं पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. रोहितनं 57 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून वन डेतील 44 वे अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं या अर्धशतकासह कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विराटचा ( 15) विक्रम रोहितनं आज मोडला. रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 वेळा 50 हून अधिक धावांची खेळी केली आहे. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( 24) अव्वल स्थानी आहे. 


 

India vs Australia, 3rd ODI: स्टीव्ह स्मिथनं कर्णधार फिंचला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं

पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज

Big Breaking : शिखर धवननं दुखापतीमुळे मैदान सोडलं, खेळण्यावर संभ्रम

India vs Australia, 3rd ODI: विराट कोहलीचा स्टनिंग कॅच, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का Video

U19WC : टीम इंडियाची यंग ब्रिगेडही सुसाट... श्रीलंकेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई

India vs Australia, 3rd ODI: रोहित शर्माचा विक्रम, हा पराक्रम करणारा जगातला तिसरा जलद फलंदाज

Web Title: India vs Australia, 3rd ODI: Rohit sharma broke Virat kohli record, Most Odi 50+ scores vs Australia (Indians)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.