Join us  

आधीच हरल्याचे दु:ख; त्यात आयसीसीने खिसा कापला, ऑस्ट्रेलियाला तिहेरी झटका

India vs Australia, 2nd Test : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया असा दमदार कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यात कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, दुखापतीमुळे मोहम्मद शमीनंही माघार घेतली होती. या खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्व कौशल्य दाखवले अन् ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 6:17 PM

Open in App

India vs Australia, 2nd Test : भारताविरोधातील पहिली टेस्ट ऐतिहासिक विक्रम मोडत जिंकल्याने  दुसरी टेस्टच नाही तर चारही टेस्ट आम्हीच जिंकू असा आत्मविश्वास असलेल्या ऑस्ट्रेलियाला आज एकाच दिवशी तीन धक्के बसले आहेत. भारताने पराभव केलाच, सोबत आयसीसीनेही जबर दंड ठोठावला आहे. 

मेलबर्नमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनी हरविले. मात्र, या टेस्टमध्ये ओव्हरची गती न राखल्यामुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या संघावर 40 टक्क्यांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर विश्व टेस्ट चॅम्पिअनशिपच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमला 4 अंकांचे नुकसानही झाले आहे. कर्णधार टीम पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया टीमने निर्धारित वेळेत दोन ओव्हर कमी टाकल्या आहेत. यामुळे आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी ऑस्ट्रेलियाच्या टीमचे 40 टक्के मानधन कापले आहे. आयसीसीने म्हटले की, आयसीसी आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार ऑस्ट्रेलिया टीमने ओव्हरची गती कमी केली आहे. यामुळे खेळाडूंवर त्यांच्या मॅच फीमध्ये 20 टक्के दंड आकारला जातो. 

पेनने चूक कबूल केली आहे. आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी खेळत असताना नियम 16.11.2 नुसार टीमवर कमी फेकलेल्या ओव्हरमागे दोन अंक कापले जातात. ऑस्ट्रेलियाने दोन ओव्हर कमी फेकल्याने त्यांना ४ अंक गमवावे लागले आहेत. 

India vs Australia, 2nd Test : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया असा दमदार कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यात कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, दुखापतीमुळे मोहम्मद शमीनंही माघार घेतली होती. या खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्व कौशल्य दाखवले अन् ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. अजिंक्यचे शतक अन् रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीला अन्य गोलंदाजांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला.

 अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या दमदार फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी Boxing Day कसोटीत ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताच्या पहिल्या डावातील १३१ धावांची आघाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादवनं एक बळी टिपला.  

दुसऱ्या डावात जो बर्न्स ( ४), स्टीव्हन स्मिथ ( ८), कर्णधार टीम पेन ( १) ही मंडळी एकेरी धाव करून बाद झाले. मॅथ्यू वेड ( ४०) व मार्नस लाबुशेन ( २८) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु या दोघांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी तंबूत पाठवले. ६ बाद ९९ धावांवरून कमिन्स व ग्रीन या जोडीनं ऑस्ट्रेलियाला १५६ धावांपर्यंत नेले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहनं संपुष्टात आणली. कमिन्स १०३ चेंडूंत २२ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या बाजूनं ग्रीनचा संघर्ष सुरूच होता, परंतु सिराजनं ग्रीनला ( ४५) बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य होते.

मयांक अग्रवाल ( ५) व चेतेश्वर पुजारा ( ३) झटपट माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व अजिंक्य रहाणेनं संगाला विजय मिळवून दिला. अजिंक्यनं विजयी धाव घेतली. गिल ३५ धावांवर, तर अजिंक्य २७ धावांवर नाबाद राहिला. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा रहाणे तिसरा भारतीय कर्णधार ठरला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआयसीसीआॅस्ट्रेलियाअजिंक्य रहाणे