Join us

Breaking : मिठाचा खडा! बोटावर मलम लावणाऱ्या रवींद्र जडेजावर ICCची कारवाई, भारताच्या विजयानंतर बॅड न्यूज 

 India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत एक डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 14:44 IST

Open in App

 India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत एक डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १७७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४०० धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या २२३ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना  ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ९१ धावा करता आल्या. आर अश्विनने ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जडेजाने फलंदाजीतही ७० धावांचे योगदान दिले. पण, भारताच्या या विजयी आनंदात मिठाचा खडा पडला.. आयसीसीने  जडेजावर कारवाई केली. 

पुणेकर व्हा सज्ज, तिसऱ्या कसोटीचा मान? भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत मोठा बदल होण्याची शक्यतापहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जडेजावर ऑस्ट्रेलियान मीडियाने बॉल टॅम्परिंग म्हणजेच चेंडू कुरतडण्याचे आरोप लावले. एक व्हिडीओ ऑसींकडून व्हायरल केला गेला आणि त्यात जडेजा बोटावर मलम लावून गोलंदाजी करत असल्याचा दावा केला.  रेफरींकडून या व्हिडीओबाबत टीम इंडियाच्या व्यवस्थापनाशी व कर्णधार रोहित शर्माशी चर्चा झाली आणि त्यांनी जडेजावरील आरोप रद्द केले. पण, आयसीसीने जडेजाला त्याच्या मॅच फी मधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली अन् एक उणे गुण ( Demerit point) दिला गेला.  जडेजाची ही लेव्हल १ ची चूक होती आणि त्याने कलम २.२० चे उल्लंघन केले.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाआयसीसी
Open in App